डीएसकेंच्या मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस काढा, कोर्टाचे आदेश

डीएसके यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची नोटीस जाहीर करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत.

डीएसकेंच्या मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस काढा, कोर्टाचे आदेश
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 10:14 AM

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची नोटीस (DSK property auction) जाहीर करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी आणि राज्य सरकारने डीएसके यांच्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये पुणे, वणी आणि लोणावळासह राज्यभरातील मालमत्तेचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी डीएसकेंच्या कोट्यवधी रुपयांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या होत्या.

डीएसके यांची मालमत्ता विक्रीतून साधारण दीड हजार कोटी रुपये मिळू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे डीएसकेंची मालमत्ता विकून पैसे परत करावे (DSK property auction), अशी मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहेत. न्यायालयाने डीएसकेंच्या मालमत्तेचा लिलावाची जाहीर नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंची मालमत्ता विकल्यानंतर सर्वात अगोदर डीएसकेंनी ज्या बॅंकेतून कर्ज घेतले होते, त्या बँकांना पैसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर शिल्लक पैसे ठेवीदारांनी देण्यात येणार आहेत.

डीएसकेंकडून नवा प्रस्ताव

दरम्यान, डीएसके यांनी न्यायालयात नवा प्रस्ताव सादर केला. बंद पडलेले प्रकल्प बांधकाम व्यवसाय नेमून पूर्ण करावेत. या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे. 40 टक्के रक्कम बांधकाम व्यावसायिकाला आणि उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराला द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला.

काय आहे डीएसके प्रकरण?

डीएसके ग्रुपने जास्त व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांचे पैसे घेतले. मात्र, डीएसके ग्रुप गुंतवणूकदारांचे पैसे परत करु शकला नाही. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्या विरोधात शेकडो गुंतवणूकदरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांना डीएसके यांना फेब्रुवारी 2018 मध्ये दिल्लीतून अटक केली होती. डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाला देखील पोलिसांनी अटक केली. सध्या ते येरवाडा तुरुंगात आहेत.

डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी, मुलगा आणि काही नातेवाईकत सध्या तुरुंगात आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.