महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडलं आणि माझ्या आईला रडत म्हणाला, सोनियाजी…, राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

"आम्ही शक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. आता ती शक्ती काय आहे? हा सवाल आहे. कुणी तरी म्हणालं, राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. बरोबर आहे. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. भारताच्या प्रत्येक संस्थेत आहे. ईडीत, आयटी, सीबीआयमध्ये आहे", असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडलं आणि माझ्या आईला रडत म्हणाला, सोनियाजी..., राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 9:02 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईत होतोय. या निमित्ताने इंडिया आघाडीची भव्य सभा आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आलीय. या सभेत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातून सोडून गेलेल्याल महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याच्या भावनिक अवस्थेची माहिती दिली. त्यांनी या नेत्याचं नाव घेतलं नाही. पण त्यांनी या नेत्याबाबत मोठा दावा केला. “या राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडलं आणि माझ्या आईला रडत म्हणाला, सोनियाजी, मला लाज वाटतेय माझ्यात या लोकांशी लढण्याची हिंमत नाही. या शक्तीशी लढायचं नाही. मला तुरुंगात जायचं नाही. एक नाही असे हजारो लोक घाबरवलेले आहेत”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

“शिवसेना, एनसीपीचे लोक असेच गेले. तुम्हाला काय वाटतं? नाही. त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपमध्ये नेलं. ते सर्व घाबरून गेलेत. चार हजार किलोमीटर चाललो. त्यानंतर सहा हजार किलोमीटर मणिपूर ते मुंबई. धारावीपर्यंत. यावेळी जे पाहिलं, ऐकलं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही”, अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

‘आम्ही शक्तीच्या विरोधात लढत आहोत’

“आम्ही भाजपविरोधात लढत आहोत. आम्ही सर्व एका राजकीय पक्षाविरोधात लढतोय असं लोकांना वाटतं. देशालाही तसंच वाटत. पण ते सत्य नाही. हे चूक आहे. आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत नाही. देशातील तरुणांनी ही गोष्ट समजून घ्यावी. काहींना वाटतं एका व्यक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढत आहोत. नाही. आम्ही भाजपच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीला चेहरा बनवून बसवलं आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द असतो. आम्ही शक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. आता ती शक्ती काय आहे? हा सवाल आहे. कुणी तरी म्हणालं, राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. बरोबर आहे. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. भारताच्या प्रत्येक संस्थेत आहे. ईडीत, आयटी, सीबीआयमध्ये आहे”, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

Beed चा खरा तपास करायचा आहे, या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....