Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काल त्यांना गुजरातमधील एका न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्या प्रकरणात हा निर्णय घेण्यात आला.

Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया
Nana PatoleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 3:08 PM

Rahul Gandhi news : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काल गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आज या विषयात लोकसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर विधानसभेत काँग्रेस आक्रमक झाली. विधिमंडळाच्या पायऱ्यावर काँग्रेस आमदारांनी भाजपा आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला.

“मागच्या 9 वर्षांपासून मोदी सरकार देशात राज्य करतेय. ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या हे लोक देशातील जनतेचे लाखो, हजारो कोटी रुपये घेऊन पळाले. त्यांना मदत करण्याच काम मोदी सरकार करतेय” असा आरोप नाना पटोले यांनी केला.

‘हे सर्व ठरवून केलं’

“देशाचा पैसा पळवणाऱ्यांविरोधात राहुल गांधी आवाज उठवतायत. त्यांना लोकसभेत बोलू दिलं जात नाही. रस्त्यावर त्यांच्यावर बंधन आणली जातात. त्यांच्याविरोधात खोटी तक्रार सूरतमध्ये टाकून जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा काम ठरवून करण्यात आलं” असा आरोप नाना पटोले यांनी केला. ‘इंग्रजांसारख सरकार’

“या निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई उभी करु. जसं इंग्रजांच सरकार होतं, त्यांच्याविरोधात कोणी आवाज उठवला की, फाशीची शिक्षा दिली जायची. गोळ्या झाडल्या जायच्या. आज लोकशाहीच्या माध्यमातून ईडी, सीबीआय मागे लावली जाते. आरबीआय, देशाची तिजोरी लुटली जात आहे. तुम्ही काहीही करा, मी तुमच्याविरोधात बोलत राहीन असं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलय. आज राहुल गांधींच सदस्यत्व रद्द करण्यात आलं आम्ही त्याचा निषेध करतो” असं नाना पटोले म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.