कधी मातोश्री अन् आदित्य ठाकरे यांच्याजवळ असणाऱ्या व्यक्तीकडे शिदेंसेनेची सर्वात मोठी जबाबदारी
rahul kanal and aditya thackeray: कधीकाळी मातोश्री आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असणाऱ्या व्यक्तीकडे सर्वात महत्वाची जबाबदारी दिली आहे. बॅालिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या राहुल कनाल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी जबाबदारी दिली आहे. ते आता शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचा राज्यप्रमुख झाला आहे.
शिवसेनेत बंड झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरुच आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच एकमेकांच्या गटातील बड्या व्यक्तींना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सुरु आहे. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे.
कधीकाळी मातोश्री आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असणाऱ्या व्यक्तीकडे सर्वात महत्वाची जबाबदारी दिली आहे. बॅालिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या राहुल कनाल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी जबाबदारी दिली आहे. ते आता शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचा राज्यप्रमुख झाला आहे.
सलमानपासून विराटपर्यंत अनेकांशी मैत्री
सलमान खान, संजय दत्त, विराट कोहली, सुर्यकुमार यादव यांच्यासारख्या दिग्गज हिरोंच्या सोशल मीडियावर फेमस राहुल कनाल फेमस आहे. त्यांच्यावर आता शिवसेनेची सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष राहुल कनाल हे राजकीय, बॅालिवूड आणि क्रिकेट जगतातल्या लोकांसाठी काम करत आहे. आय लव्ह मुंबईच्या माध्यामातून राहुल कनाल यांनी मुंबईच नव्हे तर भारतभर काम केले आहे.
विधानसभेपूर्वी ठाकरेंना धक्का
मुक्या प्राण्यांना अन्नदानापासून ते त्यांना राहण्याची व्यवस्था राहुल कनाल यांनी केली आहे. कोरोना काळात राहुल कनाल यांनी केलेल्या कामांची पोचपावती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी दिलेली आहे. आता विधानसभेच्या तोंडावर राहुल कनाल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. हा उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे.
मातोश्रीचे निकटवर्तीय म्हणून ओळख
राहुल कनाल एकेकाळी आदित्य ठाकरे यांच्याशी जवळचे संबंध होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसत होते. त्यामुळे मातोश्रीचे निकटवर्तीयांपैकी एक असे राहुल कनाल यांची ओळख झाली होती. परंतु आता ते शिंदे सेनेची सोशल मीडियाची जबाबदारी पाहणार आहे. सोशल मीडियांच्या प्रमुखपदी आल्यानंतर राहुल काही मोठे गौप्यस्फोट करणार का ? हे पाहावं लागेल.