नववर्षाच्या जल्लोषाला दहशतवादी हल्ल्याचं सावट, रेल्वे पोलीस आयुक्तांनी जारी केला अलर्ट

नववर्षा(New Year)च्या जल्लोषाला दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. रेल्वेचे पोलीस आयक्त (Railway Police Commissioner) कैसर खालिद (Kaiser Khalid) यांनी याबाबतची माहिती दिलीय.

नववर्षाच्या जल्लोषाला दहशतवादी हल्ल्याचं सावट, रेल्वे पोलीस आयुक्तांनी जारी केला अलर्ट
पोलीस
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 10:07 PM

मुंबई : नववर्षा(New Year)च्या जल्लोषाला दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. रेल्वेचे पोलीस आयक्त (Railway Police Commissioner) कैसर खालिद (Kaiser Khalid) यांनी याबाबतची माहिती दिलीय. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानं मुंबई(Mumbai)त रेल्वे पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत.

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वांनाच अलर्ट केलंय. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्यात. शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, सर्व पोलिसांना कामावर येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मुंबईतली महत्त्वाची स्थानके दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.

पश्चिम उपनगरात 35 ठिकाणी नाकाबंदी

नवीन वर्षाचं स्वागत करताना सर्वांनीच खबरदारी घ्यायची आहे. पोलिसांची पश्चिम उपनगरात 35 ठिकाणीनाकाबंदी असणार आहे. त्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या वतीने अनोखी भेटदेखील देण्यात येणार आहे आणि जे लोक वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई करून एक मेसेज दिला जाणार आहेत, अशी माहिती नितीन पवार, पोलीस उपायुक्त, मुंबई वाहतूक विभाग यांनी दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त

31 डिसेंबरला अनेकजण मॉल, चौपाट्यावर सेलिब्रेशनसाठी जातात. त्यामुळे अशा ठिकाणांवर मोठी गर्दी होते, ही गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मुंबईत जमावबंदीच्या काळात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला गर्दी टाळण्याचा आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे रक्ताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Corona Virus : दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

Mumbai : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा 2 किलोमीटर टप्पा पूर्ण, उर्वरित 70 मीटरचे खणन येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार

‘आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ’, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट!

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.