Rain | राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात पावसाचे आगमन

Rain | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरु झाला आहे. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात मध्यरात्री पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईला दुहेरी फायदा झाला आहे. मुंबईतील हवेची प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

Rain | राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात पावसाचे आगमन
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 8:12 AM

मुंबई, दि. 26 नोव्हेंबर 2023 | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली असताना शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. मुंबईतील अनेक भागांतही शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. मुंबईत आलेल्या या पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी होणार आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस

मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मेघागर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. या भागांत पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कल्याणमध्ये रिमझिम पाऊस

कल्याणमध्ये वीजांच्या कडकडीतसह रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. यामुळे रविवारी पहाटे कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात मध्यरात्री पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. शहापुरात अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खळ्यांमध्येसाठून ठेवलेल्या भाताचा पाऊसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट

पुणे हवामान विभागाने रविवारी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.