पालघर : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दुपारी इशारा दिल्याप्रमाणे डहाणूमध्ये गुरुवाती रात्री तर जिल्ह्यात अन्यत्र सकाळी आठ वाजल्यापासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने शेतकऱ्यांबरोबरच मच्छिमार, वीटभट्टी उत्पादक आणि गवत, पावळी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा, वसई सर्वच तालुक्यात पाऊस सुरू झाला असल्याने मासे सुकवण्यासाठी टाकलेल्या मच्छिमाराचे मोठे नुकसान झालं आहे. (rain in mumbai palghar Huge losses from farmers to fishermen in palghar)
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरलेले हरभरा, तूर, वाल, उडीद अवकाळी पावसामुळे वाया गेलं आहे. इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला, फळभाज्या, कलिंगड, पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या सर्वच पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. तसंच फळ बागायतदार विशेषतः आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा दिवसात झाडावर केलेली औषध फवारणी पावसामुळे फुकट गेली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
डहाणू तालुक्यात मध्यरात्री दोन वाजल्यापासून तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामात केलेल्या लागवडीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तर सुकी मच्छी, ताडी व गवत उद्योगाला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. खरीप हंगामातील भात पिकाचे परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. दरम्यान रब्बी हंगामाच्या प्रारंभी अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पालघर शहरात शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात विक्रीसाठी माळ घेऊन आलेल्याचा माल भिजला त्यामुळे हातावर पोट असलेल्या या दुकानदारांची मोठी पंचाईत झाली. तर महिन्याचा दुसरा आठवडी बाजार असला तरी शासकीय व निम शासकीय तसेच खाजगी कर्मचारी व औधोगिक कामगारांचे पगार दोन दिवसापूर्वी झाल्याने महिन्याच्या सामान खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसाने तारांबळ उडवली.
जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मध्यम स्वरूपच्या हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली होती आणि मग काही तास नन्तर पावसाळा सुरुवात झाली. सर्वत्रच कमी अधिक वेके नुसार पाऊस सुरू झाला असला तर या पावसाने कहर केला असून तो सतत कोसळतच आहे. त्यामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. (rain in mumbai palghar Huge losses from farmers to fishermen in palghar)
इतर बातम्या –
मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज
Video : Mumbai |अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुंबईत पावसाची हजेरी #Mumbai #MumbaiRain pic.twitter.com/ul6dod50UC
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(rain in mumbai palghar Huge losses from farmers to fishermen in palghar)