मुंबई : गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Rainfall will increase across the state including Mumbai, vigilance instructions from the administration)
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर परिणाम होत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे. मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी सध्या धोक्याची नाही. मात्र असाच पाऊस पडत राहिला तर नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहर व तालुक्यात रिमझिम अशा पावसाच्या सरी होत होत्या. मात्र शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज सकाळपासूनच शहर व तालुक्यात ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि इंदापूर तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
आज पावसाने यवतमाळ शहरासह नेर तसेच पुसद परिसरात जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसला. यवतमाळसह नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात पावसा दरम्यान गारपीट झाली. पावसाळ्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे बैल पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. (Rainfall will increase across the state including Mumbai, vigilance instructions from the administration)
Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, यादीत सँट्रो, i10 Nios चा समावेश#Hyundai #discount https://t.co/yadExTLkns
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
इतर बातम्या
अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी, भाजप प्रवक्त्यांचं आव्हान
अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने 100 कोटी रुपये द्या, नरेंद्र पाटलांची मागणी