Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : ‘शिवलकरच्या डोळ्यात पाणी होतं’, राज यांना अमेरिकेत भेटलेला तो मराठी मुलगा कोण? VIDEO

Raj Thackeray : राज ठाकरे मागचे काही दिवस परदेशात होते. अमेरिकेत एकदा ते हॉटेलच्या खाली उभे होते. त्यावेळी शिवलकर तिथे आला, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. राज ठाकरेंनी अमेरिकेत भेटलेल्या या मराठी मुलाचा किस्सा सांगितला तो नक्की वाचा.

Raj Thackeray : 'शिवलकरच्या डोळ्यात पाणी होतं', राज यांना अमेरिकेत भेटलेला तो मराठी मुलगा कोण? VIDEO
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 1:38 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे रंगशारदा येथे पदाधिकारी मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी अमेरिकेत भेटलेल्या मराठी मुलाचा किस्सा सांगितला. “मी मागचे 20-25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेच्या बृह्नमहाराष्ट्र मंडळाने मला तिथे बोलावलेलं. तिथे माझी मुलाखत झाली. तुम्ही पाहिली की नाही मला माहित नाही. परदेशातील सर्व बंधु-भगिनी मला तिथे भेटले” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“मी एकदा हॉटलेच्या खाली उभा होतो, कुठेतरी चाललेलो मी. एक मुलगा आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पाया पडला. मला बोलला साहेब काहीही करुन तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला आलं पाहिजे. शिवलकर त्याचं नाव. मी म्हटलं बघतो, कसा वेळ मिळतो ते. त्यावर तो म्हणाला, तुम्ही काहीही करुन जेवायला आलच पाहिजे” असं राज यांनी सांगितलं.

शिवलकर राज ठाकरेंना काय म्हणाला?

राज ठाकरेंना भेटलेल्या त्या शिवलकरने सांगितलं की, “साहेब मी लहानपणी तुमची भाषण ऐकली, त्यापासूनच प्रेरणा घेऊनच मी परदेशात आलो. इथे रेस्टॉरंट सुरु केलं. मी त्याला म्हटलं, अरे मी मराठी मुला-मुलींनी व्यवसाय सुरु केला पाहिज असं म्हटलेलं, देश सोडा नाही. तरीही ही मुलं परदेशात जाऊन व्यवसाय सुरु करतात, स्वत:च अस्तित्व निर्माण करतात. बर वाटतं” शिवलकरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन राज ठाकरे का थक्क झाले?

“जेव्ह मी शिवलकरच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेव्हा थक्क झालो. ते एसी रेस्टॉरंट 100 लोकांच्या आसन क्षमतेच होतं. बाहेरच्या बाजूला 50 लोकांची आसन क्षमता होती. अधिकृत. त्या हॉटेलमध्ये दीड ते दोन तासांची वेटिंग होती. 40 टक्के लोक परदेशी होते. बर वाटतं हे सर्व पाहून. असंख्य मराठी लोक भेटले. त्यांनी तिथे व्यवसाय सुरु केलेत. अस्तित्व निर्माण करतायत” असं राज ठाकरे म्हणाले.

अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.