राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो, अमित ठाकरेंकडून फोटो पोस्ट

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच आजोबा- आजी झाले. घरात आलेल्या या चिमुकल्या पाहुण्याचा फोटो नुकताच अमित ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो, अमित ठाकरेंकडून फोटो पोस्ट
राज ठाकरेंच्या नातवाचं बारसंImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:42 PM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच आजोबा- आजी झाले. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांच्या पत्नी मिताली ठाकरे (Mitali Thackeray) यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. 5 एप्रिल 2022 रोजी दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. घरात आलेल्या या चिमुकल्या पाहुण्याचा फोटो नुकताच अमित ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. अमित यांनी पोस्ट केलेला बाळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता, तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.

अमित यांनी बाळाचा कृष्णधवल फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या फोटोत बाळाने अमित ठाकरेंची करंगळी घट्ट पकडल्याचं पहायला मिळत आहे. हा फोटो पोस्ट करत अमित ठाकरेंनी कॅप्शनमध्ये हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. अवघ्या काही तासांत या फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. या फोटोवर मनसेचे पदाधिकारी तसेच अमित ठाकरे यांच्या इतर मित्रमैत्रिणींनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा फोटो-

अमित आणि मिताली हे कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. लग्नाआधी जवळपास दहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होत्या. त्यातच मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्याने कृष्णकुंजवर मितालीचं सारखं येणंजाणं सुरू होतं. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनीसुद्धा होकार दिला.

हेही वाचा:

Kitchen Kallakar: ‘किचन कल्लाकार’मध्ये एकनाथ खडसे, किरीट सोमय्यांची धमाल

Jayant Patil: हिशोबच मांडायचाय तर उद्धव ठाकरे मोदींकडे मांडतील, हिशोबावरून जयंत पाटील आणि दानवेंमध्ये जुंपली

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.