अमितच्या लग्नातही राज ठाकरेंचं लकी नंबरचं गणित!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 नंबरला ‘लकी’ मानतात. पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मग मनसेची स्थापना केल्यानंतर असो, राज ठाकरेंचं हे ‘9’ अंकावरील प्रेम वारंवार दिसत राहिलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं देखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेचा दिवस म्हणजे 9 मार्च 2006 म्हणजै 9 […]

अमितच्या लग्नातही राज ठाकरेंचं लकी नंबरचं गणित!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 नंबरला ‘लकी’ मानतात. पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मग मनसेची स्थापना केल्यानंतर असो, राज ठाकरेंचं हे ‘9’ अंकावरील प्रेम वारंवार दिसत राहिलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं देखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेचा दिवस म्हणजे 9 मार्च 2006 म्हणजै 9 तारखेला पक्षाची स्थापना केली, तर राज ठाकरेंच्या गाडीचा नंबरही 9 आहे. 9 अंकाचं प्रेम अमितच्या लग्नातही दिसून आले.

राज ठाकरेंनी अमित आणि मितालीच्या लग्न ठरवण्यापासून ते लग्न सोहळा पार पडेपर्यंत आपल्या लकी नंबरचा आधार घेतला. लग्नाची तारिख असो किंवा मग मुहूर्त, प्रत्येक ठिकाणी 9 अंकाची गोळाबेरीज दिसून येते.

अमित-मितालीच्या लग्नाच्या तारखेकडे निरखून पाहिल्यास, 9 अंकाचं गणित सहज लक्षात येतं. अमित आणि मितालीच्या लग्नाची तारिख 27 जानेवारी आहे. म्हणजेच, 2 + 7 = 9.

आता जरा मुहूर्ताविषयी जाणून घेऊ. साधारणत: बहुतेक जण मुहूर्त हा ब्राम्हणाकडून काढतात. पण, अमित-मितालीच्या लग्नाचा मुहूर्तही राज ठाकरेंनीच काढलाय की असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचं कारण म्हणजे पुन्हा 9 अंक. अमित आणि मितालीच्या लग्नाचा मुहूर्त होता 12 वाजून 51 मिनिटे. म्हणजेच, 1 + 2 + 5 + 1 = 9.  

याचा अर्थ, मुलाच्या लग्नाचा मुहुर्त काढतानाही राज ठाकरेंनी 9 अंकाची जुळवाजुळ केलीच. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नातही कोणतीच कसर सुटू नये, म्हणून राज ठाकरेंनी सगळे सोपस्कर पार पाडले. त्याचवेळी आपल्या लकी नंबरला देखील त्यांनी परिवाराच्या आनंद सोहळ्यातही पुरेपूर जपलं, हेच यावरुन सिद्ध होतं.

पाहा स्पेशल रिपोर्ट :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.