लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

लॉकडाऊन कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं, अशा सूचना राज ठाकरे यांनी केल्या (Raj Thackeray on All Party Meeting with CM Uddhav Thackeray)

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 3:35 PM

मुंबई : परप्रांतीय कामगारांसाठी परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्याचा एक्झिट प्लॅन काय? हा प्रश्नही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला विचारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. (Raj Thackeray on All Party Meeting with CM Uddhav Thackeray)

गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, छोटे दवाखाने सुरु करावेत, जे परप्रांतीय मजूर बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. MPSC विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं, अशी सूचनाही सरकारला केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न विचारल्याचं ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

1. लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही.

2. परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो.

3. महाराष्ट्रातील कारखाने उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून राज्यातील तरुण तरुणींना ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत त्याची माहिती द्यावी. आपल्याकडे विदर्भ मराठवाडा याठिकाणी त्यांना रोजगाराविषयी माहिती नसते.

4. छोटे दवाखाने सुरु करावेत. आजारी पडल्यानंतर दाखवायचं कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी एखादा पोलीस असावा. कारण रांगा लागतील तेव्हा नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस असावा

5. गेले दीड महिना पोलीस थकले आहेत, तेही प्रचंड तणावाखालून गेले आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरलं जात आहे. अशा ठिकाणी  एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत.

6. सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार अशा अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईळ? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या

7. रमझानची वेळ सुरु आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. लोक बाहेर पडतात. अनेक सण घरात राहून साजरे केले. त्यामुळे मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा. जर विचार होत नसेल तर या ठिकाणी अधिक फोर्स लावणे गरजेचे आहे. जेणेकरुन या गोष्टी बंद होतील.

8. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना घरी जाण्यासाठी किंवा जे लोक हॉस्टेलमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल ती करावी

9. शाळा कशाप्रकारे सुरु करणार. ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवणं

(Raj Thackeray on All Party Meeting with CM Uddhav Thackeray)

सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक

राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण होतं. महाराष्ट्रात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेतली. सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा केली. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेही सर्वपक्षीय बैठकीला हजर होते.

उद्धव ठाकरे यांनी याआधीही ‘कोरोना’च्या संकट काळात राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा होत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे सरकारला काय सूचना करणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं.

कोणकोणत्या पक्षांचे नेते होणार सहभागी

शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना बहुजन विकास आघाडी एमआयएम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष

(Raj Thackeray on All Party Meeting with CM Uddhav Thackeray)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.