Raj Thackeray Loudspeaker : मी त्या मौलवींचे आभार व्यक्त करतो, अजानचा भोंगा वाजला नाही; राज ठाकरे खूश

ज्यांना हा विषय समजला, त्या सर्वांचे आभार, असे राज ठाकरे म्हणाले. श्रेय घेण्याचा हा विषय नाही, असेही ते म्हणाले. मंदिरावरचे भोंगेही (Loudspeaker) काढले गेले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर अजान लाउडस्पीकरवर झाली तर हनुमान चालिसाही चालणार, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

Raj Thackeray Loudspeaker : मी त्या मौलवींचे आभार व्यक्त करतो, अजानचा भोंगा वाजला नाही; राज ठाकरे खूश
मशिदींवरच्या भोंग्यांवर मत मांडताना राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 2:28 PM

पुणे : कायद्याचे पालन करणाऱ्यांना तुम्ही ताब्यात घेणार आणि जे कायद्याचे उल्लंघन करत आहेत, त्यांना मोकळीक देणार, हे लक्षात आले नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. 90 टक्के मशिदींवर भोंगे वाजलेच नाहीत. त्यामुळे या मशिदींमधील मौलवींचे आभारही राज ठाकरे यांनी मानले. आजच्या अल्टिमेटमवर आपली भूमिका त्यांनी मांडली. ते मुंबईत बोलत होते. ते म्हणाले, की विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी सांगितले होते, की सर्व मशिदींना सूचना दिल्या आहेत. मग 135 मशिदींवर अजान झाली, त्यावर काय उत्तर आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांना केला. ज्यांना हा विषय समजला, त्या सर्वांचे आभार, असे राज ठाकरे म्हणाले. श्रेय घेण्याचा हा विषय नाही, असेही ते म्हणाले. मंदिरावरचे भोंगेही (Loudspeaker) काढले गेले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर अजान लाउडस्पीकरवर झाली तर हनुमान चालिसाही चालणार, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

‘135 मशिदींवर काय कारवाई करणार?’

90, 92 ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयार होते. त्यामुळे मशिदीतील मौलवींचे आभार मानतो. आमचा विषय त्यांना नीट समजला. पण मला आता मुंबईचा जो रिपोर्ट आला. त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींवर पाच वाजण्याच्या आत अजान लागली गेली. नांगरे पाटील यांचा फोन आला, ते म्हणाले, आम्ही सर्वांशी बोललो. ते अजान लावणार नाहीत. मग 135 मशिदींवर कशी लागली? त्यावर कारवाई करणार की नाही केवळ आमच्याच कार्यकर्त्यांची धरपकड करणार, असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.

‘पुन्हा सांगतो हा धार्मिक नाही, सामाजिक विषय’

राज ठाकरे म्हणाले, की कालपण सांगितले परत सांगतो, हा सामाजिक विषय आहे. धार्मिक नाही. त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ. माणुसकीपेक्षा धर्म मोठा असेल तर आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. अजान लाऊडस्पीकरवर लागली तर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लागेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही आमच्या धर्माला घट्ट राहावे लागेल. तुमच्या सणासुदीला लाऊडस्पीकर लागतो तर समजू शकतो. पण 365 दिवस तुम्ही लावत असाल तर आम्हाला नाही ऐकायचे ते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.