Maharashtra Bhushan : हे प्रशासनाला कळालं नाही का? श्री सदस्यांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सरकारला सवाल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्री सेवकांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पण त्यांनी प्रशासनाला देखील धारेवर धरलं आहे.

Maharashtra Bhushan : हे प्रशासनाला कळालं नाही का? श्री सदस्यांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सरकारला सवाल
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 12:39 PM

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार ( Maharashtra Bhushan Award ) सोहळ्यात 11 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमाला एकप्रकारे गालबोट लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा अशा घटना होणार नाही म्हणून काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. रविवार खारघरच्या सेंट्रल पार्क येथील मैदानावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्यभरातून त्यांचे अनुयायी उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट लिहित म्हटले की, ‘काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.  ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सहभागी आहे.’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी देखील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांनाही दोघांनी श्रध्दांजली वाहिली असून त्यांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.