Raj Thackeray : राज ठाकरे यांचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ, मुंडेंपासून फडणवीस यांच्यापर्यंतची ‘टोल’वाटोलवी काय?

टोल हा सर्वात मोठा स्कॅम आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. येत्या दोन चार दिवसात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. त्यांच्याशी टोलबाबत चर्चा करणार आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.

Raj Thackeray : राज ठाकरे यांचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ, मुंडेंपासून फडणवीस यांच्यापर्यंतची 'टोल'वाटोलवी काय?
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 1:19 PM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांना घेरलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टोलबाबत काय विधानं केली होती, याचे व्हिडीओच दाखवले. यात गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओंचाही समावेश होता. राज ठाकरे यांच्या या लाव रे तो व्हिडीओमुळे सर्वच राजकीय पक्ष टोलच्या मुद्द्यावरून अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तसेच टोल हा सर्वात मोठा स्कॅम असल्याचा दावा करतानाच या घोटाळ्याची चौकओशी करण्यात यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकरा परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी टोल संदर्भात गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं याचे व्हिडीओच दाखवले. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यात लाव रे तो व्हिडीओ सुरू केल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

याचा अर्थ टोलनाकेवाले लुटत आहेत?

राज्य सरकार म्हणतंय टोल घेतलाच जात नाही. याचा अर्थ टोलनाकेवाले लुटत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटेन. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर तुमच्याशी संवाद साधेल. तुम्ही टोलविरोधात याचिका दाखल केली होती. ती मागे का घेतली हे मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे. या सरकारवर काही दबाव आहे का? हे कुणाच्या तरी उदरनिर्वाहाचं साधन आहे का? याची उत्तरं तुम्हाला दोन चार दिवसात मिळतील, असंही त्यांनी सांगितलं.

राजकारण्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन

मला अजूनही कळलेलं नाही. ही माणसं प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट करू म्हणतात. यांचं सर्वांचं सरकार येऊन गेलं आहे. पण टोलमुक्तीसाठी त्यांनी काहीही केलं नाही. राजकारणातील अनेक लोकांचं हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. यांच्याकडे दर दिवसाला, दर आठवड्याला, महिन्याला टोलमधून पैसे जात असतात. यामुळे हे लोक टोल बंद करायला तयार नाही. रस्ते चांगले मिळणार नाही. मला फक्त लोकांचा प्रश्न पडला आहे. हे लोक थापा मारतात तरी त्यांना मतदान होतं ते कसं होतं? हे मला अनाकलनीय आहे, असंही ते म्हणाले.

‘त्या’ व्हिडिओत कोण काय म्हणालं?

देवेंद्र फडणवीस – रस्त्यांचं नव्हे खड्डयांचं राज्य आहे. सरकारला इंटरेस्ट टोलमध्ये आहे. ठेकेदारच टेंडर तयार करतो, तोच टेंडर भरतो. वर्षानुवर्ष टोल महाराष्ट्रातील लोक भरत आहेत. तो बंदच करावा लागेल. त्यासाठी महाराष्ट्रात परिवर्तन करावं लागेल

अजित पवार – 44 टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही टोलला टेस्टिंग करणार नाही. एसटीला टोल द्यावा लागू नये असा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे – आमच्या आंदोलनानंतर 67 टोलनाके बंद झाले. अधिकृत आणि अनधिकृत टोलनाके बंद केले. हे 44 टोलनाके आम्ही आंदोलन केल्याने बंद केले. ते त्यांच्या मनाने बोलत नाही

उद्धव ठाकरे – आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करणार

देवेंद्र फडणवीस – सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील 11 टोल आम्ही पूर्ण बंद करत आहोत. आम्ही 31 मे रोजी 12 वाजल्यानंतर कार जीप मोटर, शाळेची बस आणि सरकारी बसला 53 टोलमधून सूट देणार आहोत. त्यानंतर तीन ठिकाणीच टोल राहील. कोल्हापूरच्या टोलबाबत समिती स्थापन केली आहे. त्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई एन्ट्री पॉइंट राहील. त्यासाठीही आम्ही एक समिती स्थापन केली आहे. ते त्याबाबतचा अहवाल देणार आहेत. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. पण 31 मे नंतर आम्ही राज्याला टोलमुक्ती देत आहोत.

गोपीनाथ मुंडे – महायुती पाच पांडवांची झाली आहे. या बैठकीत 25 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर मोठा मोर्चा काढणार आहोत. टोल मुक्त महाराष्ट्र करा ही आमची मागणी आहे. तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्र निर्माण केला नाही तर आम्ही टोलमुक्त करू. त्यानंतर आम्ही एक्सपर्ट समिती नेमू आणि त्यावर बोलू.

उद्धव ठाकरे – टोल चालू आहेत. सगळीकडे टोल चालू आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.