‘तुमची त्यांना भीतीच उरली नाही’, बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 100 पेक्षा जास्त जागांवर आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तसेच त्यांचा जोरदार प्रचारदेखील सुरु आहे. राज ठाकरे यांच्या दिवसभरात तीन ते चार सभा पार पडत आहेत. त्यांची आज बोरिवलीतही सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी अतिशय बेधडक आणि सर्वसामान्य जनतेला विचार करायला भाग पाडेल, असं भाषण केलं. राज ठाकरे यांची पोटतिडकी त्यांच्या भाषणातून दिसली. पण तरीदेखील बोरिवलीची जनता त्यांच्या उमेदवाराला निवडून देते का? ते आगामी काळात स्पष्ट होईल.

'तुमची त्यांना भीतीच उरली नाही', बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 8:11 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बोरीवलीत प्रचार सभा पार पडली. या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नागरी समस्यांवर भावना मांडली. विधासभा निवडणूक असल्याने उमेदवार आता गल्लोगल्लीत, घराघरापर्यंत प्रचारासाठी फिरत आहेत. पण निवडून आल्यानंतर हेच उमेदवार 5 वर्षे नागरिकांकडे मागे फिरुन पाहतदेखील नाहीत. हीच वास्तविकता राज ठाकरे यांनी आपल्या भाणषातून व्यक्त केली. रस्त्यांची अवस्था, फुटपाथ आणि सर्वसामान्य नागरिकांचे होणार हाल यावर राज ठाकरे यांनी प्रकाश टाकत अतिशय मार्मिकपणे भाष्य केलं. त्यांच्या भाषणातीला या मुद्द्यांमुळे त्यांच्यातील कळकळ आणि संवेदनशील स्वभावाचं दर्शन बघायला मिळत आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोले लगावले.

“माझ्याकडे वेळ कमी आहे. त्यातून मुंबईचं ट्राफिक आणि त्याचा झालेला विचका, त्यातून मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा सुरु आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी. मला बोरवलीला सभा घ्यायचीच होती. ते यादीमध्ये नव्हतं. पण घ्यायचीच होती. मी बोरीवली मतदारसंघासाठी अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे. जाणीव असलेला, अभ्यास असलेला उमेदवार दिला आहे”, असं राज ठाकरे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.

‘कोणती डेव्हलपमेंट झाली?’

“आज बऱ्याच जणांचे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत. 20 वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज सुद्धा त्याच जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसचं तर बोलूच नका. एका बाजूला प्रगती झाली, असं म्हणायचं. पण दुसरीकडे जुनं बोरिवली चांगलं होतं असं सुद्धा वाटत आहे. याचं कारण म्हणजे कसलीही यंत्रणा लावलेली नाही. बाहेरून बदाबदा माणसं येत आहेत. एखादं शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे. पण जे मूळ करता आहेत त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

हे सुद्धा वाचा

‘तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात’

“प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे की मी या शहरात राहतो आहे. या बोरवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. फक्त भारतात नव्हे तर जगात इतकं मोठं नॅशनल पार्क असलेलं शहर म्हणजे फक्त मुंबई आहे. आपण बोलतो घरात बिबट्या आला. पण तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात. आपलं संजय गांधी नॅशनल पार्क पवईला सुरू होतं आणि गौडबंदरला संपतं इतकं मोठं पार्क आहे. अशाप्रकारे पार्क इतर देशांकडे असतं तर त्यांनी इतकं जपलं असतं की आपण त्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत”, अशी भावना राज ठाकरे यांनी मांडली.

‘आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत’

“आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात? काहीही चालतंय. फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे? याची कल्पना तुम्हाला सुद्धा नाही आणि राजकारण्यांना सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरलं नाही. तर शहरांना कुठून येणार? त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत”, असं राज ठाकरे रोखठोक म्हणाले.

‘त्यांना भीतीच उरली नाही’

“आतापर्यंत कोण-कोण आमदार, नगरसेवक, खासदार होऊन गेले त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्यावर हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. पण त्यांना भीतीच उरली नाही. चांगल्या जातीचा, चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की, नाही यावर आपण मतदान करीत नाही”, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या नावावर तुमच्याकडे मत मागायला येतात. पण तुम्हाला प्रश्न पडत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मतदान केलं पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केलं पण आपल्या बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? पाच वर्ष कशाला म्हणतात कळतं का?”, असं राज ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.