Raj Thackeray Speech : ये रिश्ते टूट जायेंगे तो भारत टूट जायेगा, अबू आझमींचं राज ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर

मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर त्यावर आता नेते मंडळी जोरदार टीका करत आहे. अबू आझमी यांनीही यावर शायरीतून (Abu Azmi) फटकेबाजी केली आहे.

Raj Thackeray Speech : ये रिश्ते टूट जायेंगे तो भारत टूट जायेगा, अबू आझमींचं राज ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर
अबू आझमी यांचं राज ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 5:08 PM

मुंबई : शनिवारी शिवतीर्थावर भाषण करताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चौफेर बॅटिंग केली. गेल्या अनेक दिवसात खूप गोष्टी साचल्या आहेत म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून (Cm Uddhav Thackeray) सुरूवात केली ते मशीदीच्या भोंग्यांपर्यंत पोहोचले. मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर त्यावर आता नेते मंडळी जोरदार टीका करत आहे. अबू आझमी यांनीही यावर शायरीतून (Abu Azmi) फटकेबाजी केली आहे. हवेली, झोपडी सबका मुक्कदर फूट जायेगा, अगर ए साथ हिंदू-मुसलमान का छूट जायेगा, दुआ किजीए की हम में प्यार के रिश्ते रहें कायम, ये रिश्ते टूट जायेंगे तो भारत टूट जायेगा, अशी शायरी करत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशीवरील भोंग्यांबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे हारलेले नेते

राज ठाकरेंच्या भाषणावर निशाणा साधताना, राज ठाकरे हे थकलेले, हरलेले नेते आहेत, ते परेशान आहेत. राजकारणात त्यांना जागा मिळत नाही. म्हणून आता ते मुस्लिमांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू पाहत आहेत. या पूर्वी ते परप्रांतीय आणि इतर अनेक मुद्द्यावर राजकारण करत आले आहेत. त्यांना जर नोईज पोल्युशन ( ध्वनी प्रदूषण ) बाबत एवढी चिंता आहे तर कधी त्यांनी बीयर बारमध्ये डीजे, लग्नात डीजे, फटाके , नेत्यांच्या स्वागत मध्ये फटकेबाजी , गणपती , नवरात्री इतर वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणवर आवाज उठवला आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

बरसाती मेंढक बाहेर आले

तसेच आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही खुशाल हनुमान चाळीसा वाचा, पण मंदिरात वाचा, परवानगी घेऊन लाचा, रस्त्यावर नको, आम्ही तिथे बाजूला सरबत पाजनार, असा टोला त्यांनी लगाल आहे. हे सर्व जे काही सुरू आहे ते निव्वळ राजकारण आहे. आम्ही याची निंदा करतो, असेही ते म्हणाले. तसेच मोहीत कंबोज यांच्याबाबत बोलताना, मोहित कंबोज हे सुद्धा बोलायला लागले. त्यांनी गप्पच राहावं, आपलं काम करावं. जनता हुशार आहे. असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच समाजवादी पार्टी भाईचारा आणि विकासच्या मुद्द्यावर काम करेल. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. म्हणून बरसाती मेंढक सारखे नेते बाहेर आले असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Bhaskarrao Patil Khatgaonkar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस देखणे व्यक्तिमत्त्व, भास्करराव पाटील खतगावकर सुस्साट; भविष्यवाणीही वर्तवली

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, उद्या चौकशीला हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?

उलवे येथील भूखंड तिरुपती देवस्थानाला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.