Raj Thackerey gudipadwa speech live update : राज ठाकरेंच्या सभेचा टिझर आधीच रिलीज, आज पुन्हा बाळासाहेबांची झलक दिसणार?
गेल्या वेळी वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर (Mns Teaser) आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असा थेट इशारा दिला होता.
मुंबई : दरवर्षी गुढी पाडव्याला (Gudipadwa) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवतिर्थावर जोरदार धडाडते. आजही मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रला तेच पहायाला मिळणार आहे. मनसैनिकांना राज ठाकरेंच्या (Raj Thackeray Gudipadwa Speech) आजच्या तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. पुण्यातल्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. या भाषणात राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर (Mns Teaser) आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असा थेट इशारा दिला होता. त्यामुळे या आजच्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजकीय सभांवर काही मर्यादा आल्याने राज ठाकरे नावाची नेहमी धडाडणारी तोफ थंड होती. मात्र आता कोरोनाही कमी झाल्याने सण साजरे करायला थोडीफार मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे शिवतिर्थावर पुन्हा राज ठाकरेंची तोफ विरोधकांना घायळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मनसेच्या टिझरची चर्चा
Raj Thackeray यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणासाठी मनसेचा टिझर….@RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/fGuiZ2eXor
— Abhishek karande (@Abhishekkaran16) March 31, 2022
आजचं भाषण वादळी ठरणार
आज भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे. त्या टिझरला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातला राज ठाकरेंचा बाईट लावण्यात आला आहे. टिझरमध्ये ठाकरे म्हणतात, आजचे हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला, असा आवाज त्या ट्रेलरला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा तुफान आवाजही देण्यात आला आहे. हा टिझर बाहेर आल्यापासून याला लाखो लोकांनी पाहिला आहे, मनसैनिकांना हा ट्रेलर भरभररून आवडतोय. या ट्रेलरवर कमेंट आणि लाईक्सचाही पाऊस पडतोय. या टिझरने राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाची उत्सुक्ता आणखी वाढवली आहे. आजचं भाषण तुफानी होणार एवढं सांगयला हा टिझर पुरेसा आहे.
आज टार्गेट कोण?
राज ठाकरेंनी पुण्यातल्या भाषणावेळी भाजपचा तर समाचार घेतलाच, पण शिवसेनेच्या संजय राऊतांपर्यंत सर्वांचा समाचार घेतला होता. राज ठाकरेंनी पुण्यातल्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही सोडलं नव्हतं. काही दिवसात मुंबई महापालिकेसह काही मोठ्या महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज ठाकरेंनी काही काळ आधीच दौऱ्यांचा आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वीच बोरीवलीत त्यांनी बोलताना यावेळी विरोधकांना हाणायचं म्हणजे, हाणायचं म्हणतं स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे हे भाषण वादळी ठरणार एवढं मात्र नक्की. हे भाषण तुम्हाला टिव्ही 9 मराठीच्या चॅनलवर आणि यूट्यूब लाईव्हसह सगळीकडे पाहताच येणार आहे. शिवाय भाषणाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळणार आहे.
’10 ते 15 महिन्यात गोव्यात आमचं सरकार’, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांचा दावा!
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची महागाईची गुढी, बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल