कोरोनावरील लस घ्या अन्यथा पिझ्झा बर्गरही मिळणार नाही, राजेश टोपेंचं किशोरवयीन मुलांना आवाहन

राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोनावरील लस घ्या अन्यथा पिझ्झा बर्गरही मिळणार नाही, राजेश टोपेंचं किशोरवयीन मुलांना आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:18 PM

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांसंदर्भात टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज्यात पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, रात्रीच्या अनावश्यक सेवा बंद करणं, बाजारापेठेतील गर्दी, लग्न समारंभात होणारी गर्दी यासंदर्भात भाष्य केलं. राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

15 ते 18 वयोगटातील लसीकरण जलदगतीनं

15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत.  15 ते  20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक  त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.

राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागणार का?

राजेश टोपे :  आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल किंवा 40 टक्के बेड वापरले जातील त्यावेळी लॉकडाऊन लागेल. मात्र, सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यातील रुग्णालयातील 10 ते 15 टक्के बेड व्यापलेले आहेत. राज्यातील मृत्यूदर वाढलेला नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री 11 ते 5 या वेळेत काही निर्बंध लावता येते का हे पाहावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू वर मुख्यमंत्री कधी निर्णय घेणार?

आरोग्य विभाग, टास्क फोर्स इतर यंत्रणा मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांमार्फत अहवाल देत असतात. मुंबईत  25 हजारांपर्यंत रुग्ण आढळून येत असतील तर मुंबईतील अनावश्यक सेवा, उशिरापर्यंतचं हॉटेलिंग हे सगळं थांबलं पाहिजे. रात्री फिरण्यावर निर्बंध लावता येईल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. अनावश्यक सेवा  बंद करता येतात का यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

लोकल सेवेवर निर्बंध येणार?

लोकल सेवा बंद करण्यात येणार नाही. अनावश्यक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु असतात त्यांची वेळ कमी करता येते का हे पाहावं लागणार आहे. मॉल्स, रेस्टॉरंट याबाबत काही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, रात्रीच्या अनावश्यक सेवांबाबत निर्णय घेतला जाईल.

मोठ्या मंडईमध्ये  नियमांचं पालन होत नाही त्यावर काय करणार?

मंडईमध्ये मास्क न वापरण्यांवर कारवाई करण्यात येईल. निर्बंध पेपरवर केले आहेत पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यांना सूचना दिलेल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

लग्न आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणीची गर्दी कशी कमी करणार?

लग्न आणि अंत्यसंस्कार थाबवता येणार नाही. लग्न हे दोन्ही बाजूच्या  25-25 लोकांच्या उपस्थितीत पार पाडावीत. आपल्याला राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमातील गर्दी टाळावी लागेल. त्यासाठी शासनानं दिलेल्या आदेशांचं पालन करावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

इतर बातम्या:

टीईटी, म्हाडापरीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेसह इतर चौघे व पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांना कोरोनाची लागण

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पूर्ण लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे म्हणाले त्यावेळी ऑटोमेटिक लॉकडाऊन लागेल

Rajesh Tope appeal students between 15 to 18 for corona vaccination and citizens should follow corona rules

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.