Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील : आरोग्य मंत्री

राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा, की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील : आरोग्य मंत्री
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 1:26 PM

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा, की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री (Rajesh Tope On Lockdown Extension) आजच निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते.

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयी देशातील स्थितीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदींनी देशातील स्थिती पाहता लॉकडाऊनवर राज्यांनी आपआपला निर्णय घ्यावा (Rajesh Tope On Lockdown Extension), असं सांगितलं.

“राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील. परंतु, पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार ग्रीन झोन असलेल्या भागांमध्ये आर्थिक व्यवहार सुरु राहतील. आर्थिक परिस्थितीचा विचार करता आर्थिक व्यवहार सुरु करावे लागतील. परंतु, ते हॉटस्पॉटमधले नको. रेड झोनमधले नको. ग्रीन झोनमध्ये सीमा बंद करुन आर्थिक सर्व व्यवहार सुरु ठेवाव्यात, असं पंतप्रधानांनीही नमुद केलं. त्यामुळे या संदर्भातील निर्णय 3 मेनंतर नक्की होईल”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक सुरु आहे. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे ही बैठक पार पडत आहे. यावेळी शरद पवारही उपस्थित आहेत.

थोड्या वेळापूर्वी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीबाबत मंत्रीमंडळाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचे बैठकीत राज्यपालांना स्मरण करुन देण्यात आलं. मागील बैठकीचे इतिवृत्तांत या बैठकीत अंतिम मंजूर केलं.

राजस्थान-कोटात अडकलेले विद्यार्थी आणि 3 मे ला लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याचा कालावधी संपत असताना पुढील निर्णयांबाबत ठाकरे-पवार बैठकीत चर्चा होत असल्याची शक्यता आहे. तसेच, आज पंतप्रधान यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदर्भातही चर्चा होत असल्याची शक्यता आहे.

डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य सेविकांना 50 लाखांचे विमा संरक्षण देऊ : राजेश टोपे

डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य सेविका इत्यादी सर्वांना लाखांचे विमा संरक्षण देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “ज्या ज्या यंत्रणा कोविड-19 परीस्थितीत काम करत आहेत, मग ते डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य सेविका ते अंगणवाडी सेविका असो, त्या सर्वांना 50 लाखांचे विमा संरक्षण दिले जाईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना घाबरत आहेत. त्यांना सरकार पीपीई किट उपलब्ध करुन देतील. जर त्यांना कोरोना झाला आणि दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांना 50 लाख विमा कव्हर देऊ. खासगी डॉक्टरांना संरक्षण देऊ, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं (Rajesh Tope On Lockdown Extension).

तसेच, केंद्राने मान्यता दिली तर ठीक आहे. पण, जर केंद्राने मान्यता दिली नाही तर राज्यसरकार या लोकांना विमा संरक्षण देईल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु होणार नाही : आरोग्य मंत्री 

याशिवाय, आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीवरही भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच, रेल्वे, विमानतळ सुरु होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोटामधील विद्यार्थांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील

कोटामध्ये अडकलेल्या 2,000 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी बसेस पाठवाव्या आणि त्यांना घरी परत आणावे, अशी विनंती मला अनेकांनी केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर निर्णय घेतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं (Rajesh Tope On Lockdown Extension ).

संबंधित बातम्या :

Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर

3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त

वर्ध्यात 7 दिवसात 250 जणांनी लक्ष्मणरेषा ओलांडली, जिल्ह्यात प्रवेशासाठी कुठे अॅम्ब्युलन्स, तर कुठे ट्रकचा वापर

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.