नाईट कर्फ्यू आणि लोकलबाबत मुख्यमंत्री लक्ष ठेवून, नव्या कोरोनामुळे कडक नियम : राजेश टोपे

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन जानेवारीपासून सुरु होईल, अशी सर्वसामान्यांना आशा आहे. यावर राजेश टोपे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे (Rajesh Tope on Night Curfew).

नाईट कर्फ्यू आणि लोकलबाबत मुख्यमंत्री लक्ष ठेवून, नव्या कोरोनामुळे कडक नियम : राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेस टोपे यांचं मुंबई लोकल ट्रेनबाबत महत्त्वाचं विधान
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 2:47 PM

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या आढळलेल्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. या नाईट कर्फ्यूचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूचे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाईट कर्फ्यू वाढेल का की आज त्याचा शेवटचा दिवस आहे, याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. त्याचबरोबर मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन जानेवारीपासून सुरु होईल, अशी सर्वसामान्यांना आशा आहे. यावर देखील राजेश टोपे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे (Rajesh Tope on Night Curfew).

“लोकल ट्रेन किंवा नाईट कर्फ्यू असो, आपण दररोज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून आहोत. नाईट कर्फ्यूचा आजचा शेवटचा दिवस आहे. नाईट कर्फ्यू पुढे आणखी काही दिवस वाढवायचा का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांना अत्यंत बारकाईने आकडेवारी आणि इतर सर्व गोष्टींची माहिती दिली जात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील”, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं (Rajesh Tope on Night Curfew).

“परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीला ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे का, याची देखील तपासणी केली जात आहे. तपासणी होईपर्यंत त्यांना क्वारंटाईन केलं जात आहे”, असं टोपे यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आतापर्यंत आठ रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्ण विलगीकरणात आहेत. सध्या त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जातोय. नवी नियमावली आम्ही खूप काटेकोर राबवत आहोत. आठ रुग्ण आढळल्याने लोकांनी काळजी घेतली पाहिजे, घाबरू नका. या नव्या कोरोना विषाणूचा फार वेगाने प्रसार होतो, त्यामुळे सजग राहिले पाहिजे”, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

“राज्यातील कोरोनाची संख्या वाढीचा वेग कमी आहे. मृत्यूदरातही लक्षणीय घट झाला आह. बरं होण्याचं प्रमाण 95 टक्के आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा नवा अवतार फार डोकं वर काढेल असं वाटत नाही”, असं मंत त्यांनी मांडलं.

“नियम जनहितासाठी करतो ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कायदा सगळ्यांनी पाळला पाहिजे”, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा :

Corona Vaccine | लस श्रीमंतांना परवडेल, पण गरिबांचं काय? राजेश टोपेंचा सवाल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.