Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे साकारणार; राजेश टोपे म्हणतात…

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हे यांची पाठराखण केली आहे.

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे साकारणार; राजेश टोपे म्हणतात...
rajesh tope
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 8:28 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हे यांची पाठराखण केली आहे. कोल्हे यांच्या या भूमिकेकडे केवळ कलेच्या दृष्टीनेच पाहावे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा 45 मिनिटाचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे असं मला समजलं. अमोल कोल्हे आज मला भेटले. तासभर आमची चर्चा झाली. ते पुण्यात एक प्रकल्प राबवत आहे. त्यावर चर्चा झाली. त्यांनी मला एक क्लिप दाखवली. त्यात ते गोडसेची भूमिका साकारत आहेत. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

50 टक्के लसीकरण पूर्ण

यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. देशाच्या सरासरी पेक्षा आपलं राज्य लसीकरणात पूर्ण होत आहे. 15 ते 18 वयोगटातील 50 टक्के मुलामुलींचं लसीकरण पूर्ण झालं आहे. ज्यावेळी आपण शाळा सुरू करू तेव्हा ऊर्वरीत मुलांचं लसीकरण पूर्ण करून घेण्यास मदत होईल. दोन विचार प्रवाह नेहमीच असतात. शासनाला अभ्यास योग्य वाटला तो निर्णय सरकारने घेतला आहे, असं ते म्हणाले.

मुलं बाधित होण्याचा आकडा मोठा नाही

कोरोनामुळे राज्यातील मुलं बाधित झाले आहेत. पण हा आकडा मोठा नाही. मुलांची प्रतिकार शक्ती चांगली असते. त्यामुळे कोरोनामुळे मुले हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत आहेत अशी परिस्थिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

45 मिनिटाचा माहितीपट

‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा एक माहितीपट आहे. 45 मिनिटाच्या या माहितीपटाचे अशोक त्यागी यांनी दिग्दर्शन केलं आहे. कल्याणी सिंह यांनी या सिनेमाची निर्मितीत केली आहे. तर अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. गांधींची हत्या का केली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न माहितीपटातून दिसणार आहे. 1964 साली भारतीय सरकारनं गांधीजींच्या हत्येची कारणं शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.एल.कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगानं आपल्या अहवाल 1970 साली सादर केला होता. या अहवालाच्या आधारेच या सिनेमाची सुरुवात होते. या चित्रपटात बोलला जाणारा प्रत्येक शब्दांनशब्द हा कायदेशीर कागदपत्रांमधून घेतलेल्या शब्दांचा अनुवाद असल्याचं सांगितलं जातंय. एकूण 45 मिनिटांची ही फिल्म असून आता या फिल्मबाबत नेमके प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

गांधी विरोधी सिनेमाला विरोध करणारच

दरम्यान, राष्ट्रवादीचेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

बापू-खान यांचं नातं वेगळं

तसेच गफार खान जेव्हा गांधीजींना भेटायचे, तेव्हा गांधीजी कटाक्षाने मांसाहारी जेवण बनवायला लावायचे. अफगाणिस्तान हा गफारखान यांचा मूळ प्रदेश. ते मासांहारी होते. त्यांच्या जेवणाची आबाळ होवू नये म्हणून बापू स्वतः लक्ष ठेवून असायचे. बापू-खान यांचं नातं वेगळं होत. सन्मानाचा भरभक्कम आधार त्याला होता, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

Gehraiyaan movie : दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 3 तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज

Rohit Patil : नगर पंचायत निवडणूक गाजवणाऱ्या रोहित पाटलांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळणार? रोहित पवारांचे संकेत

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.