TET च्या तारखांवर विचार करा, आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची, राजेश टोपेंची वर्षा गायकवाड यांना विनंती, टीईटी पुन्हा लांबणीवर?

आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परीक्षा आयोजित करण्याचं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या घोळामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती.

TET च्या तारखांवर विचार करा, आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची, राजेश टोपेंची वर्षा गायकवाड यांना विनंती, टीईटी पुन्हा लांबणीवर?
राजेश टोपे, आरोग्य मंत्री.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:43 PM

मुंबई: आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परीक्षा आयोजित करण्याचं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या घोळामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. 24 ऑक्टोबरला गट क आणि 31 ऑक्टोबरला गट ड परीक्षा आयोजत करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीनं येणारी परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही परीक्षा एकादिवशी येणार असल्यानं दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी बोलताना मार्ग काढणार असल्याचं म्हटलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची असल्यानं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती करणार असल्याचं म्हटलं.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राजेश टोपे यांनी 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि (शिक्षक पात्रता परीक्षा) टीईटीची परीक्षा एकत्र आल्या आहेत, असं म्हटलं. मी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना विनंती केली आहे आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा अशी विनंती केली आहे. मी याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल, असं आरोग्यमंत्री म्हणाले. विद्यार्थीचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असं राजेश टोपे म्हणाले.

महाटीईटी पुन्हा लांबणीवर?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षा यापूर्वी एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं आयोजन 10 ऑक्टोबरला करण्यात येणार होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं राज्य सरकारच्या परवानगीनं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षण विभागानं टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबरला घेण्याचं निश्चित केलं होतं. मात्र, आरोग्य विभागाची गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेण्याचं निश्चित करण्यात आल्यानं टीईटी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षचे दोन पेपर

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात

पात्रता

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या

आधी राणे म्हणाले, मुख्यमंत्री आलेच पाहिजेत असं काही नाही, आता चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्तेच, राणे-ठाकरे एकाच मंचावर

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक?,आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत; काँग्रेसची चौकशी समिती नागपुरात

Rajesh Tope said Maha TET exam may be postpone again due to health department exam group d exam conducted on 31 october

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.