दरेकर म्हणाले, राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा; शेट्टी म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राजू शेट्टी हे बिनबुडाचा लोटा आहे, अशी जहरी टीका दरेकर यांनी केली होती. (raju shetti slams pravin darekar over farmers protest)

दरेकर म्हणाले, राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा; शेट्टी म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?
RAJU SHETTI
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 6:01 PM

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राजू शेट्टी हे बिनबुडाचा लोटा आहे, अशी जहरी टीका दरेकर यांनी केली होती. त्याला शेट्टी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. प्रविण दरेकर कुणाची भाटगिरी करत आहेत?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. (raju shetti slams pravin darekar over farmers protest)

राजू शेट्टी आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करत आहेत? गुजरातची की महाराष्ट्राची? असा सवाल करतानाच आम्ही आंदोलनाचं हत्यार खाली ठेवलं नाहीये. जर निर्णय झाला नाही तर आंदोलनावर ठामच राहीन असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांना शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी फालतू लोकांच्या टीकेला मी उत्तर देत नाही, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलं म्हणून आलो

महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेला प्रचंड महापूर आणि नुकताच मराठवाड्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टी संदर्भातल्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मला या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे. या बैठकीचे आयोजन सह्याद्रीमध्ये केले गेलं होतं. पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्याच्या मागणीसाठी काल मी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देवून काल आंदोलन स्थगित करून आज बैठकीसाठी आलो, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

दरम्यान, शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी 2019 च्या धर्तीवर मदतीची घोषणा केली होती. पण अद्याप शासननिर्णय झालेला नाही. त्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करुन शासननिर्णय घेऊन असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचं सरकारनं सांगितलं होतं. आता शेतकरी अडचणीत असताना ते पैसे तातडीने द्यावे अशी आमची मागणी होती. सरकारनं ती घोषणा केली आहे. त्यापासून शासन दूर जाणार नाही. पण सरकारवर सध्या आर्थिक संकट असल्यामुळे जुळवाजुळव सुरु आहे. शेतकऱ्यांना नक्की मदत देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही

चिखली, आंबेगावच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर लोक सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण, 32 वर्षापूर्वी पुनर्वसनाच्या नावाखाली मिळालेली जागा अद्याप त्यांच्या नावावर झालेली नाही. म्हणून लोक आपली जागा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सरकारनं दफ्तर दिरंगाईचे प्रकार टाळले पाहिजेत. लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे, असा सल्लाही शेट्टी यांनी यावेळी दिलाय. त्याचबरोबर आंदोलन मागे घेणार असा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिला नाही. आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही. पण चर्चेचा मार्गही आम्ही खुला ठेवल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. (raju shetti slams pravin darekar over farmers protest)

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांचं बुडीत शेतीचं कर्ज माफ करा, केवळ ट्विट नको, शासन निर्णय व्हावा; राजू शेट्टींची मागणी

घरगुती गणपती तयार करण्यासाठी यंदा विशेष टूल किट, पण पुढच्या वर्षी गणपतीचा साचा हवा, अशी नागरिकांची मागणी

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

(raju shetti slams pravin darekar over farmers protest)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.