tv9 Marathi Special: गुलाल कुणाचा? महाराष्ट्रासह चार राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका आज; काय आहे चित्रं?

Rajya Sabha Election 2022: महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यात एका आमदाराचं निधन झाले. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात असल्याने सध्या विधानसभेत 285 आमदार आहेत.

tv9 Marathi Special: गुलाल कुणाचा? महाराष्ट्रासह चार राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका आज; काय आहे चित्रं?
गुलाल कुणाचा? महाराष्ट्रासह चार राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका आज; काय आहे चित्रं?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 6:30 AM

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटक या चार राज्यातील राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha Election) आज होत आहेत. या चारही राज्यातील राज्यसभेच्या 16 जागांसाठी उद्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर 11 राज्यांतील 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, कर्नाटक, महाराष्ट्र (maharashtra), हरियाणा आणि राजस्थानात (rajasthan) अधिकचे उमेदवार उभे राहिल्याने या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात तर तब्बल 23 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. चारही राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एक एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही ठिकाणी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालं आहे. राजकीय पक्षांनी काहीही दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. सर्वच राजकीय पक्षांना क्रॉस व्होटिंग होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच खबरदारी घेतली जात आहे.

महाराष्ट्रातही घमासान

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यात एका आमदाराचं निधन झाले. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात असल्याने सध्या विधानसभेत 285 आमदार आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी 40.71 मतांची गरज आहे. भाजपकडे 106, शिवसेनेकडे 56, एनसीपीकडे 53 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमदेवार सहज विजयी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाणार आहेत. तर शिवसेनेने सहावा आणि भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने पेच वाढला आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडे 22 मते आहेत. तर शिवसेनेकडे दुसऱ्या उमेदवारासाठी 14 मते आहे. भाजपला सहा आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपची संख्या 113 होते. त्यामुळे तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडे 29 मते होतात. दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. यात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रसचे मिळून 153 आमदार आहेत. 8 अपक्ष आणि 8 छोट्या पक्षाचे आमदारही आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांना सोडून शिवसेनेकडे 27 अतिरिक्त मते राहणार आहेत. या अपक्षांनी आणि छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला मते दिली तर ही संख्या 43 वर पोहोचेल. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येईल. मात्र, शिवसेना आणि भाजपने अपक्ष आपल्याच सोबत असल्याचा दावा केल्याने महाराष्ट्रातील निवडणूक चुरशीची झाली आहे.

राजस्थानात काय घडतंय?

राजस्थानात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. काँग्रेसने या निवडणुकीत तीन उमेदवार उतरवले आहेत. तर भाजपने एक उमेदवार दिला आहे. घनश्याम तिवारी हे भाजपचे उमेदवार आहेत. तर, प्रमोद तिवारी, मुकूल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर खासदार सुभाष चंद्रा हे सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. चंद्रा हे 2 ऑगस्ट रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.

चार जागेसाठी हरियाणात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजस्थान विधानसभेची संख्या 200 आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची गरज आहे. राज्यात काँग्रेसचे 105, भाजपचे 71 आमदार आहेत. त्यामुळे या आकडेवारीनुसार भाजपचा एक आणि काँग्रेसचे दोन उमेदवार सहज निवडून येणार आहे. चौथ्या जागेसाठी इतर पक्ष किंवा अपक्षांची मदत घ्यावी लागमार आहे. काँग्रेसला रालोदचं एक आणि माकपाची दोन मते मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी त्यांना तिसरा उमेदवार विजयी करण्यासाठी 14 अतिरिक्त मतांची गरज पडणार आहे. तर भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरलेल्या सुभाष चंद्रा यांना आठ मतांची गरज पडणार आहे. त्यांना भाजपची तीन मते आणि हनुमान बेनीवाला यांच्या पक्षाची तीन मते मिळणार आहेत. मात्र, बीटीपीचे आमदार आणि अपक्ष आमदारांची मते यावेळी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे राजस्थानातही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

हरियाणातील गणित काय?

हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र या दोन जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून कृष्णलाला पंवार, काँग्रेसकडून अजय माकन आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून कार्तिकेय शर्मा निवडणूक रिंगणात आहेत. कार्तिकेय यांचे वडील विनोद शर्मा हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेच आपले आमदार फुटण्याची भीती काँग्रेसला आहे.

हरियाणा विधानसभेत एकूण 90 आमदार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी प्रत्येकी 31 मतांची गरज आहे. भाजपकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे भाजपला आपल्या अधिकृत उमेदवारांना सहज विजयी करणं सहज सोपं आहे. काँग्रेसकडे 31 आमदार आहेत. सर्व आमदारांनी अजय माकन यांना मतदान केलं तर ते सहज विजयी होतील.

अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांना भाजपचे 9, जजपाचे 10, हलोप, इनेलो या पक्षांची प्रत्येकी एक आणि अपक्षांची सात मते मिळाल्यास हा आकडा 28वर जातो. अशावेळी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जरी क्रॉस व्होटिंग केलं तरी माकन यांचा खेळ खराब होईल. दरम्यान, अपक्ष आमदार बलराज कुंडू, इनेलो आमदार अभय चौटाला यांनी अजून कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतची घोषणा केलेली नाही.

कर्नाटकात काय होणार?

कर्नाटकात राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. कर्नाटक राज्यसभेच्या चार जागा रिक्त आहेत. मात्र सहा उमेदवार मैदानात आहेत. भाजपने तीन, काँग्रेसने दोन आणि जेडीएसने एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कर्नाटक विधानसभेत एकूण 225 आमदार आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराला विजयासाठी 46 मतांची गरज आहे. सध्या भाजपकडे 120, काँग्रेसकडे 69, जेडीएसकडे 32 आमदार आहेत. इतर छोट्या पक्षांचे चार आमदार आहे. आकडेवारीनुसार भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. चौथ्या जागेसाठी तीन पक्षांमध्ये कडवी लढत होणार आहे. आपल्या तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडे अतिरिक्त 28 मते आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे 23 मते आहेत. तर जेडीएसकडे 32 मते आहेत. जेडीएसची कोणत्याही राजकीय पक्षासोबत राजकीय तडजोड नाही झाली तर यावेळी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.