तुम्हाला लाज, शरम वाटायला हवी…राखी सावंत भडकली; ‘या’ राजकारण्यांवर केला हल्लाबोल

मोहित कंबोज आणि सुषमा अंधारे यांनी राखी सावंतचं नाव घेऊन एकमेकांवर टीका केली. त्यामुळे राखी सावंत भडकली आहे. राखीने थेट या राजकारण्यांची लाजच काढली आहे.

तुम्हाला लाज, शरम वाटायला हवी...राखी सावंत भडकली; 'या' राजकारण्यांवर केला हल्लाबोल
Rakhi Sawant Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 2:41 PM

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहेत. अभिनेत्री राखी सावंत आणि सुषमा अंधारे दोघी बहिणी बहिणी असल्याची खोचक टीका मोहित कंबोज यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राखीची तुलना अमृता फडणवीस यांच्यासोबत होऊ शकते, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला होता. राखी सावंतचं नाव घेत कंबोज आणि अंधारे यांच्यात कलगी तुला रंगलेला असतानाच राखी सावंत मात्र चांगलीच भडकली आहे. राखीने एक व्हिडीओ शेअर करत थेट राजकारण्यांची लाजच काढली आहे.

राजकारण्यांकडून नावाचा वापर केला जात असल्याने राखी सावंत हिने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करून आपल्या खास शैलीत मोहित कंबोज आणि सुषमा अंधारे यांचं नाव न घेता त्यांना फैलावर घेतलं आहे. नावात काय ठेवलंय. ज्यांचा स्वत:चा ड्रामा एवढा आहे तर नावात काय ठेवलंय. तुम्ही ड्रामेबाज आहात. तुम्हाला मीडिया हवा. तुम्हाला लाज शरम असायला हवी. जी मुलगी15-20 वर्षापासून एवढी मेहनत करून पुढे आलीय तिचं नाव वापरून तुम्ही वादात राहत आहात. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. पण तुमच्यावर मला हसू येतंय, असं सांगतानाच राखी सावंतचं पुन्हा नाव घेताना विचार करा, असा खरमरीत इशाराही राखी सावंतने दिला आहे.

हे सुद्धा वाचा

तुम्ही नाटकी आहात

माझ्याबद्दल बोलणाऱ्याचे नाव घेण्याची गरज नाही. माझ्याबद्दल बोलण्यापूर्वी मेहनत घेतली पाहिजे. स्वत:च स्वत:च्या चुली पेटवून त्यावर स्वत:च्या भाकरी शेकाना. दुसऱ्यांच्या चुलीत कशाला नाक खुपसता. थोडी लाज असावी. नाटक तुमचे लोक करतात, कोणी खुर्ची वाचवण्यासाठी करतात, कोणी खुर्चीवर बसण्यासाठी नाटक करतात. पण आमच्या नावाचा वापर का करता? असा संतप्त सवाल तिने केला आहे.

मला डॅमेज करण्याचा प्रयत्न

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मोहित कंबोज यांनी राखीची तुलना मी सोडून इतर कोणाशी केली असती तर ते योग्य वाटले असते. मी कधीही फोटो शूट केले नाही. राखीची तुलना अमृता फडणवीस सोबत होऊ शकते. दोघीची प्लास्टिक सर्जरी झाली. दोघी मॉडेल आहेत. शिवाय दोघी गायक आहेत. अमृता फडणवीस आणि राखी सावंत तुलना होऊ शकते. मोहित कंबोज यांनी राखी सावंतशी तुलना केली त्यात मला कुरघोडीचे राजकारण करायचे नाही. मला डॅमेज करण्याचा हा भाग आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

मोहित कंबोज काय म्हणाले होते?

दरम्यान, मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं होतं. सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोन्ही बहिणी बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. तर दुसरी महाराष्ट्रातील सिनेसृष्टीत आहे. रोज कोण अधिक सनसनाटी निर्माण करेल? यासाठी दोघींमध्ये सतत चढाओढ असते, अशी टीका कंबोज यांनी केली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.