ओवाळणी म्हणून भावाने दिलं मास्क, कोरोना नियम पाळण्याचं एकमेकांना प्रॉमिस, कोविड रुग्णालयात अनोखं रक्षाबंधन

रुग्णांना कोविड बाधेमुळे आजच्या राखी पौर्णिमेला आपल्या आप्तांना भेटणे शक्य नव्हते. ही उणीव भरुन‌ काढण्याचा प्रयत्न म्हणून आज़ रुग्णालयात राखी पौर्णिमेचा सण आवश्यक ती काळजी घेत साजरा करण्यात आला. या अंतर्गत परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारार्थ दाखल असलेल्या भावांना; तर कोविडची बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून हा सण साजरा केला.

ओवाळणी म्हणून भावाने दिलं मास्क, कोरोना नियम पाळण्याचं एकमेकांना प्रॉमिस, कोविड रुग्णालयात अनोखं रक्षाबंधन
CORONA HOSPITAL RAKSHABANDHAN
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 5:42 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुलुंड परिसरात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रुग्णांना कोविड बाधेमुळे आजच्या राखी पौर्णिमेला आपल्या आप्तांना भेटणे शक्य नव्हते. ही उणीव भरुन‌ काढण्याचा प्रयत्न म्हणून आज़ रुग्णालयात राखी पौर्णिमेचा सण आवश्यक ती काळजी घेत साजरा करण्यात आला. या अंतर्गत परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारार्थ दाखल असलेल्या भावांना; तर कोविडची बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून हा सण साजरा केला. (Raksha Bandhan celebrated in unique way by mumbai mulund Covid Hospital brother give mask as gift and promised to follow corona rule)

ओवाळणी म्हणून भावांकडून बहिणींना ‘मास्क’ची भेट

राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून भावांनी आपल्या बहिणींना ‘मास्क’ची भेट दिली. तसेच घरातील सर्वांना योग्य प्रकारे मास्कचा वापर करण्याचे व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे ‘प्राॅमिस’ घेतले. या अनोख्या रक्षांबधनबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप आंग्रे यांनी अधिक माहिती दिली आहे.

रुग्ण बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे 

या रुग्णालयात सध्या 308 खाटा कार्यारत असून यापैकी 58 खाटा या ‘अतिदक्षता खाटा’ (ICU Bed) आहेत. याच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण बांधवांना आज राखी बांधून येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी राखी पौर्णिमा साजरी केली. तर रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णांनीदेखील रुग्णालयातील आपल्या डॉक्टर भावांना राखी बांधून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आजचा राखी पौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला.

रुग्णालयाद्वारे 13 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार 

दरम्यान, ‘कोविड’ बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी आपल्या महानगरपालिकेने उपचार केंद्रे व रुग्णालये सुरू केली आहेत. यापैकीच एक जम्बो उपचार रुग्णालय हे मुलुंड परिसरातील ‘रिचर्डसन आणि कृडास’ या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेच्या जागेवर 15 जुलै 2020 पासून कार्यरत आहे. आजवर या रुग्णालयाद्वारे तब्बल 13 हजारांपेक्षा अधिक कोविडबाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत. याच रुग्णालयात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं करण्यात आलं.

इतर बातम्या :

पती गुन्हेगार होताच, पण पत्नीचा क्रूरतेला कळस, जोडीदाराला संपवलं, नंतर घरातच गाडलं, मुंबईतील भयानक घटना

एक राखी कोरोना योद्ध्यांसाठी, मुंबईच्या महापौरांचे अनोखे रक्षाबंधन

“गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती!”

(Raksha Bandhan celebrated in unique way by mumbai mulund Covid Hospital brother give mask as gift and promised to follow corona rule)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.