Ralilway Megablock : मुलुंड टोलनाका ते ऐरोली ब्रिजपर्यंत मोठी वाहतूक कोंडी
मध्य़ रेल्वेकडून ठाणे आणि सीएसएमटी स्थानकातील काही प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई ते ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुलुंड टोलनाका ते ऐरोली ब्रिज पर्यंत मोठी वाहतूक कोंडी आहे. एकीकडे मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने खाजगी वाहने घेऊन कर्मचारी कामावर घेऊन आले आहेत. त्यामुळे आज सकाळी आणि आता संध्याकाळी देखील वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. सकाळी देखील ऐरोली जवळ कंटेनरचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला होता.
मध्य रेल्वेवर मोठी गर्दी
आज मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपनगरातून मुंबईत येणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालय सुटल्यानंतर देखील आता अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने आज रेल्वे देखील उशीरा धावत आहेत.
रेल्वेचा मेगाब्लॉक का?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक अकराचं काम मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे त्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातील प्लॅटफॉर्मचे देखील काम करण्यात येणार असल्याने त्या ठिकाणी देखील मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
ठाण्यातील मेगा ब्लॉक सुरू झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा मेगा ब्लॉक हा आज रात्री साडेबारा वाजता सुरू होणार आहे. मेगा ब्लॉग असल्याने अनेक एक्सप्रेस गाड्या दादर आणि पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात 63 तासांचा विशेष मेगा ब्लॉक तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा विशेष ब्लॉक सुरु आहे. प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि फलाटाची लांबी वाढवण्याचं काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे.
30/31 च्या मध्यरात्रीपासून ते दोन जून दुपारपर्यंतहा ब्लॉक घेतला जात आहे. 930 लोकल सेवा तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 161 गाड्या, शनिवारी 534 गाड्या आणि रविवारी 235 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबईतून युटणाऱ्या आणि येणाऱ्या 65+ मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने बेस्ट प्रशासनाने अधिक बसेस सोडल्या आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केला आहे.