AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood | BMC ची सोनू सूद विरोधात तक्रार, भाजपच्या राम कदमांनी सांगितलं कारण

कंगना रणौतनंतर सोनू सूद यांच्यावर वेळ आली असून किती जणांचे आवाज दाबणार, असा सवाल राम कदमांनी सरकारला केला आहे. (Ram Kadam Sonu Sood)

Sonu Sood | BMC ची सोनू सूद विरोधात तक्रार, भाजपच्या राम कदमांनी सांगितलं कारण
राम कदम सोनू सूद
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 1:01 PM

मुंबई: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) विरोधात अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. कंगना रणौत नंतर सोनू सूद यांच्यावर वेळ आली असून किती जणांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार, असा सवाल राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. राम कदमांनी त्याबाबत ट्विट केले आहे. ( Ram Kadam criticize MVA Government over BMC Filing Case against Sonu Sood)

भाजप आमदार राम कदम यांनी यापूर्वी कंगना रणौतच्या बाजूनं मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सदू विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राम कदमांनी त्याच्या बाजूनं भूमिका मांडली आहे. कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारनं करायलं हवं होतं. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येतीय, असं राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

 राम कदम यांचे ट्विट

सोनू सूद यांच्या विरोधात मुंबई महापालिकेची तक्रार

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली आहे. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केलीय.

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपातंर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे.

सोनू सूद यांची भूमिका

याप्रकरणी सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे. सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार

मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, भातखळकरांचा घणाघात

(Ram Kadam criticize MVA Government over BMC Filing Case against Sonu Sood)

पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.