महिलांवरील अत्याचार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची, साकीनाक्यातील बलात्काराच्या निषेधार्थ आरपीआयचे आंदोलन

साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याचा अत्यंत अमानुष प्रकार घडला. या प्रकरणातील दोषी आरोपीना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची, साकीनाक्यातील बलात्काराच्या निषेधार्थ आरपीआयचे आंदोलन
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:42 PM

मुंबई : साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याचा अत्यंत अमानुष प्रकार घडला. या प्रकरणातील दोषी आरोपीना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे आज अंधेरी साकिनाका येथील सिग्नल जवळ जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. (Ramdas Athawale and RPI Protest against Sakinaka rape case)

या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी रिपाइंचे दादासाहेब भोसले, अंकुश हिवाळे तसेच स्थानिक जिल्हा अध्यक्ष विवेक पवार, दयाळ बहादूर, प्रकाश जाधव, साधू कटके, रमेश गायकवाड, शशिकला जाधव, गुलाब म्हात्रे, भारती गुरव आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

साकिनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि हत्येचा अमानुष प्रकार अत्यंत पाशवी वृत्तीचे दर्शक आहे. या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने अविनाश महातेकर यांनी केली.

राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने

साकीनाका येथे एका पीडितेवर झालेल्या अत्याचारानंतर तिचा शनिवारी दुर्दैवी मृत्य झाला. या प्रकरणी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन पीडित कुंटूंबाची भेट घेतली. यावेळी पीडित कुंटूंबाला भेटण्यासाठी भीम आर्मी मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलीसांनी अडवले. भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलिसांनी पीडित कुंटूंबाची भेट करून दिली.

पीडित कुंटूंबाला भेटून त्यांना दिलासा देण्यात आला. पीडित कुंटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. पीडित कुंटूंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीच्या मुंबई प्रमुख उपाध्यक्ष योगीनी पगारे यांनी केली आहे. या आंदोलनात महादू पवार, अविनाश गरूड, विकी शिंगारे, दिनेश शर्मा, क्रांती खाडे, तृप्ती वाघमारे, बालाजी घाडगे तसेच आझाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष कैलास जैस्वार आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला?

मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातून या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत.

इतर बातम्या

उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

(Ramdas Athawale and RPI Protest against Sakinaka rape case)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.