Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, मागासांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ द्या; रामदास आठवलेंची मोठी मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (Ramdas Athawale)

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, मागासांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ द्या; रामदास आठवलेंची मोठी मागणी
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:48 AM

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (Ramdas Athawale Bats For Caste-based Census To Figure Out Community Wise Population)

रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी ही मागणी केली. जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असं आठवले म्हणाले.

जनगणना आयोगाशी बोलणार

जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आर्थिक मागासांनाही आरक्षण द्या

जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असं सांगतानाच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र, सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असंही ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणावर चर्चा

काही राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा बनविण्यावर भर दिला जात छआहे. उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये नव्या लोकसंख्या धोरणावर जोर देण्यात आला आहे. दोन्ही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन पेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांना सरकारी योजनांपासून दूर ठेवण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, सध्या हा निव्वळ चर्चेचा विषय असला तरी त्यातच आठवले यांच्या विधानाने भर टाकली आहे. (Ramdas Athawale Bats For Caste-based Census To Figure Out Community Wise Population)

संबंधित बातम्या:

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही, आम्ही सकारात्मक: संजय राऊत

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चाकूच्या धाकाने ट्रक चालकांची लूट, दोन सराईत गुन्हेगार ताब्यात

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोल्हापूर शहरातल्या लसीकरण केंद्रांवर गर्दीच गर्दी

(Ramdas Athawale Bats For Caste-based Census To Figure Out Community Wise Population)

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.