“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी”

रामदास आठवले यांनी 2024 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे सांगताना मोदी आंबेडकरवादी असल्याही दावा केला.

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 6:16 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास आठवले शैलीत विरोधकांना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिलाय. ते इथंच थांबले नाही तर 2024 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे सांगताना मोदी आंबेडकरवादी असल्याही दावा केला. ते प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संविधान निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते (Ramdas Athawale called Narendra Modi Ambedkarite claim pm of 2024).

“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?”

रामदास आठवले म्हणाले, “प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते, तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही त्या राज्यांमध्येही भाजपला विजय मिळालेला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी नादी लागू नये. कारण 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार आहेत.”

“विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही, 2024 मध्ये मोदीच पंतप्रधान”

“विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील,” असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार; रामदास आठवलेंचं मोठं विधान

पदोन्नती आरक्षणप्रश्नी रामदास आठवलेंकडून शरद पवारांची भेट, बैठकीत नेमकं काय ठरलं?

जीएसटीचा परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन: आठवले

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale called Narendra Modi Ambedkarite claim pm of 2024

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.