‘…तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, रामदास आठवले यांचं सर्वात मोठं वक्तव्य

रामदास आठवले यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरपीआय पक्षाला महायुतीकडून एक जागा मिळावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी करत असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता महायुतीचे इतर मित्रपक्ष आठवलेंची मागणी मान्य करतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

'...तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही', रामदास आठवले यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 4:58 PM

मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या मतदारसंघावर दावा केला जातोय. असं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडे शिर्डी लोकसभेची जागा मागितली आहे. रामदास आठवले यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली इच्छा बोलून दाखवली. तसेच महायुतीने त्यांच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही, तर आपल्याला तोंड लपवायला जागा उरणार नाही, असं मोठं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. “भाजपने आणि एकूणच आमच्या एनडीएने अब की बार 400 पार ही घोषणा दिली आहे. त्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुद्धा मोठं योगदान आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणूक लढवू द्यावी. मी स्वतः शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली. पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे”, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

“भाजप आणि मित्रपक्षांची जी काही महायुती झाली ती काही फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सामील झाला म्हणून नव्हे तर आम्ही सुद्धा भाजपमध्ये आहोत म्हणून झाली. भाजपाच्या मित्र पक्षाला सुद्धा आंबेडकरवादी मतं पूर्वी मिळत नव्हती. पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा 2012 पासून SC मतं भाजपला मिळू लागली”, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

“अशोक चव्हाण आता भाजपा सोबत आले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा सुद्धा महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने आम्हालाही एक जागा द्यावी. महायुतीने आमच्या RPI पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही”, असं मोठं वक्तव्य यावेळी रामदास आठवले यांनी केलं.

‘बारामती लोकसभा जागेवर सुनेत्रा पवार उमेदवार असणार’

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनीच मला मंत्रिपदाची पहिली संधी दिली होती. शरद पवार हे एक अभ्यासू नेते आहेत. पण जर त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी कोर्टात जावं”, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. “बारामती हा पूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता तो महायुतीचा गड आहे. कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर बारामतीमधून लोकसभेसाठी उभे होते. तेव्हा महादेव जानकर खूप थोड्या मतांनी हरले होते. आता मात्र बारामती लोकसभा सोपी नसणार. कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तिथून लोकसभेसाठी उभ्या राहणार आहेत”, असं सूचक वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.