औरंगाबाद विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणीचे नाव द्या; आठवलेंची नवी मागणी
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजाचं नाव देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत आहे. (ramdas athawale oppose to rename Aurangabad airport)
मुंबई: औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजाचं नाव देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत आहे. परंतु औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाविकास आघाडीत तू तू मै मै सुरू आहे. त्यामुळे रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या वादात उडी घेतली असून त्यांनी औरंगाबादच्या विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेण्यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. (ramdas athawale oppose to rename Aurangabad airport)
आठवले यांनी आधीच औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध दर्शविला आहे. आता त्यांनी विमानतळालाही संभाजी महाराजांचं नाव देऊ नये, असं म्हटलं आहे. अजिंठा-वेरूळ या प्रसिद्ध लेण्या आहेत. त्या प्राचीन लेण्या असून जगातील आठवे आश्चर्य आहेत. शिवाय या लेण्या म्हणजे बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या विमानतळाला या लेण्यांचं नाव द्यावं. संभाजी महाराजांच्या नावाला आमचा विरोध नाही. पण त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये, असं आठवले म्हणाले.
बौद्ध संस्कृतीचा वारसा
रिपाइंचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. मात्र औरंगाबादमध्ये बौद्ध संस्कृतीच्या जागतिक स्तरावर नावलौकिक असणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ या लेणी आहेत. अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक औरंगाबादला येतात. आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणारे अजिंठा-वेरूळ लेणीचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे, असं आठवले यांनी सांगितलं. शांतता, अहिंसा, प्रज्ञा, शील ,करुणा, सत्य या बौद्ध संस्कृतीच्या तत्वांचं प्रतीक म्हणून अजिंठा-वेरूळच्या लेण्यांना पाहिले जाते, त्यामुळे या लेण्यांचं नाव विमानतळाला देणंच उचित ठरेल, असंही त्यांनी सांगितलं.
अजिंठा-वेरूळचेच नाव का?
अजिंठा लेणीही सोयगाव तालुक्यात आहे. इ.स. पूर्व 2रे शतक ते इ.स. 4थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या 29 बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून 100 ते 110 कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. या लेणी नदीपात्रापासून 15-30 मीटर (40-100 फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. बुद्धाचे जीवन चरित्र, बौद्ध संस्कृती आणि बौद्ध धर्माचा वारसा सांगणारी ही अत्यंत महत्त्वाची लेणी आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. 1983 साली घोषित केली आहे. या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे. जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील 20 रुपयांच्या एका नोटेवर आहे. भारताचा समृद्ध वारसा सांगणारी ही लेणी असल्याने या लेणीचं नाव विमानतळाला देण्याची मागणी रिपाइंने केली आहे. औरंगाबादमध्ये हिंदू आणि मुस्लिमांची मोठी संख्या आहे. त्यामुळे विमानतळाला अजिंठा-वेरूळचं नाव दिल्यास त्याला कोणीही आक्षेप घेणार नाही. उलट विमानतळाला अजिंठ्याचं नाव दिल्यास जागतिक स्थळावर औरंगाबादची ओळख अधिक ठसवण्यात मदतच होईल. त्यानिमित्ताने औरंगाबादकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघही वाढेल, असं सूत्रांचं म्हणणं आहे. (ramdas athawale oppose to rename Aurangabad airport)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/Gb2VXyRU1V
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021
संबंधित बातम्या:
LIVE | औरंगाबादचं नामांतर पक्षाच्या आणि महाविकासआघाडीच्या अजेंड्यावर नाही: नवाब मलिक
नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू; ‘त्या’ ट्विटची शहानिशा करू: अजित पवार
आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावलं
(ramdas athawale oppose to rename Aurangabad airport)