AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचं चित्रीकरण करू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतलीय.

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले
रामदास आठवले, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 9:54 PM

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचं चित्रीकरण करू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतलीय. “नाना पटोले यांनी दिलेल्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचं चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं संरक्षण करीन. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल,” अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतलीय (Ramdas Athawale say RPI will give security to Amitabh Bachchan and Akshay Kumar).

रामदास आठवले म्हणाले, “सेलिब्रिटी सिने अभिनेते पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीका करत नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचं शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. अशी धमकी देणे चुकीचं आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही.”

“लोकशाहीत अशी धमकी देणं चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तर वेळ पडल्यास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

नाना पटोले काय म्हणाले होते?

मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला.

“अमिताभ बच्चन-अक्षय कुमार गप्प का?”

देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी कालच केला होता. (Nana Patole warns Amitabh Bachchan Akshay Kumar wont be permitted to shoot release Movies in future)

“मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात हिंमत नाही का?”

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही टीका केली. यूपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते. त्यावेळी 70 रुपये लिटर पेट्रोल झाले तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मोदी सरकारने इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा :

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारला दिवसाढवळ्या धमकी, काँग्रेसला झालंय तरी काय? : राम कदम

मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale say RPI will give security to Amitabh Bachchan and Akshay Kumar

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.