साकीनाका बलात्कार प्रकरण, रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार, RPIतर्फे 1 लाख रुपयांची मदत
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांची येत्या सोमवारी सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.ण्यात येणार आहे.
मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. या घटनेत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांची येत्या सोमवारी सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. (ramdas athawale will visit sakinaka rape case victims family on monday announces 1 lakh rupee assistance to victims family)
रामदास आठवले कुटुंबीयांची भेट घेणार, 1 लाख रुपयांची मदत
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या सोमवारी (20 सप्टेंबर) साकीनाका बलात्कार पिडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणात अॅट्रॉसिटीचा कायदा लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी यापूर्वी केली होती. या प्रकरणात राज्य सरकारने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तर दुसरीकडे आता रिपब्लिकन पक्षातर्फेही पीडित महिलेच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.
राज्य सरकारतर्फे 20 लाख रुपयांची मदत
साकीनाका बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर बलात्कार प्रकरणावर चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती.
आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
साकीनाका बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. यामधील आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे. या आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच आरोपीने गुन्हा कबुल केला असून सर्व घटनेची त्याने माहिती दिली आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यापूर्वी दिलेली आहे.
इतर बातम्या :
‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं
Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?
Video | महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – भगतसिंह कोश्यारीhttps://t.co/LfkqNuG6Rx@BSKoshyari | @maha_governor | #Women
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
(ramdas athawale will visit sakinaka rape case victims family on monday announces 1 lakh rupee assistance to victims family)