Ramdas Kadam : रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता

शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत.

Ramdas Kadam : रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता
ramdas kadam
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:57 AM

मुंबई: शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. त्यामुळे कदम हे नाराज असून ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात ते याबाबतची घोषणा करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचं दिसून येत आहे. या क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं.

विधान परिषदेतून पत्ता कापला

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेने रामदास कदम यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारलं होतं. त्यांच्या ऐवजी सुनील शिंदे यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, त्यावरही कदम यांनी मी कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्याने विधान परिषदेत जाण्याचा प्रश्नच नाही, असं विधान केलं होतं.

समर्थकांचे पत्ते कापले

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आलं. कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे आमदार आहेत. असं असतानाही कदम समर्थकांना संघटनेच्या कार्यकारिणीतून डावलण्यात आल्याने कदम हे अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच ते आज शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेऊन त्याीच घोषणा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?, शिवसेनेच्या खासदाराचा अशोक चव्हाणांना सवाल

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Omicron Update | ओमिक्रॉनचा वाढता धोका! नवी मुंबईच्या एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, चिंता वाढली

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.