मुंबई: चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केलं. राज्यपालांच्या या विधानाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सु्ळे (supriya sule) यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांना उत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी शरद स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या, असं सांगणारा शरद पवारांचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून राजामाता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे गुरु कोण? हा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुप्रिया सुळे यांनी एकूण पाच ट्विट केले आहेत. व्हिडीओ आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपीही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असं सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत म्हटलं आहे.
त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओही पोस्ट केला आहे. 1.13 मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. त्यात त्यांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं खोटं असल्याचं म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते.शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले. असं शरद पवार या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
औरंगाबादच्या तापडिया नाट्यमंदिरात काल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. आपला समाज आणि राष्ट्र बलशाली होण्यासाठी संत विचारांचा प्रवाहीपणा आवश्यक असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात समृध्द गुरूपरंपरा चालत आलेली आहे. मानवी जीवनामध्ये सदगुरू लाभणे ही मोठी उपलब्धी आहे. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं वादग्रस्त विधान राज्यपाल यांनी केलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी ( @PawarSpeaks ) स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. pic.twitter.com/9spBqWdhZF
— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
संबंधित बातम्या:
नाशिकची विद्यार्थिनी अखेर मायदेशी; अजून 8 जण युक्रेनमध्ये अडकले!
Maharashtra News Live Update : राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपने भूमिका घ्यावी : संजय राऊत