मुंबई: रेणू शर्माने गुन्हा दाखल करू नये म्हणून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. तसेच आपल्याला अनेक लोकांचे धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असून मला पोलीस संरक्षण देण्यात यावेत, अशी मागणी मी गृहमंत्र्यांकडे केली आहे, असं त्रिपाठी यांनी सांगितलं. (ramesh tripathi on rape allegations on dhananjay munde)
रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेऊन रेणू शर्मा यांची बाजू मांडतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांचीही माहिती दिली. धनंजय मुंडे प्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे आम्ही पोलिसांकडे देऊ. या प्रकरणात पोलीस उद्या एफआयआर दाखल करतील अशी आशा आहे. पोलीसांनी एफआयआर दाखल नाही केला तर आम्ही कोर्टात जाऊ, असं त्रिपाठी यांनी सांगितलं. या प्रकरणात मुंडेंकडून दबाव येत असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही
रेणू यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ काढण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची तिला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तिने केस दाखल केली नव्हती. मात्र, आता काही होणार नसल्याचं वाटल्यानेच रेणू यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. रेणू आणि करुणा या सख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही, असंही ते म्हणाले.
प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
इतर काही नेत्यांनी रेणूवर आरोप केले आहेत. केवळ रेणूची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि या प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच हा प्रकार केला जात आहे. मुंडेंविरोधातील केस कमकूवत करण्याचा हा प्रकार आहे. आरोप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिकडून आम्हाला नोटीस आलेली नाही. नोटीस आली तर त्याला उत्तर देऊ, असं ते म्हणाले. रेणूने कुणालाही हनी ट्रॅप केलं नाही. हनी ट्रॅपही झालेलं नाही. रिझवान शेख हा तर बेरोजगार होता मग हनी ट्रॅपचा प्रश्न येतोच कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे. (ramesh tripathi on rape allegations on dhananjay munde)
Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटीलhttps://t.co/v24xJEMIGb#jayantpatil | #DhananjayMunde | #ncp | @Jayant_R_Patil
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका
(ramesh tripathi on rape allegations on dhananjay munde)