रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना भाजप विरोधकांचे फोन टॅप केले होते. | Rashmi Shukla Nawab Malik

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार
रश्मी शुक्ला
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:55 PM

मुंबई: गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटसंदर्भात केलेला आरोप पूर्णपणे खोटे आहेत. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत. त्यांनी 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. (NCP retaliate after Devendra Fadnavis accusations about police transfers)

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब टाकल्यानंतर नवाब मलिक यांनी तात्काळ पत्रकारपरिषद घेऊन त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना भाजप विरोधकांचे फोन टॅप केले होते. त्या भाजपच्या एजंट आहेत. त्यांना लोकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याची सवय लागली होती. त्यामुळेच महाविकासआघाडी सरकारने शिक्षा म्हणून त्यांना थेट बढती न देता त्यांच्यासाठी वेगळ्या पदाची निर्मिती केली, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

‘देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करतायत’

देवेंद्र फडणवीस हे खोटी माहिती देऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. ते आज ज्या पद्धतीने रश्मी शुक्ला यांची बाजू घेत होते त्यावरुन फडणवीसांचा खोटेपणा उघड झाला आहे. पोलीस बदल्यांच्या रॅकेटवेळी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेऊन फोन टॅप करण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. मात्र, गृहमंत्रालयाची अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला या अनेक लोकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करायच्या, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांकडे कोणतीह स्फोटक माहिती?

गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली.

पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली.

रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. 26 तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाई करणे सोडाच पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘रश्मी शुक्लांच्या दाव्याप्रमाणे कोणत्याही बदल्या झाल्या नाही, फडणवीस खोटं बोलतायत’

रश्मी शुक्ला यांचा तो अहवाल माझ्याकडे आला आहे. यामध्ये त्या बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याचे बोलत आहेत. पोलिसांच्या बदल्या या पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डकडून केल्या जातात. त्यामध्ये सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असतो. अधिकाऱ्यांच्या शिफारसीनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येतो. कोणत्याही मंत्र्याला थेट पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे अधिकार नसतात. रश्मी शुक्ला यांनी अहवालात ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत, पैशांची देवाणघेवाण झाल्याचे म्हटले आहे. पण त्यापैकी 80 टक्के बदल्या झालेल्याच नाहीत. त्यामुळे हा अहवाल खोटा आहे. त्यावेळी सर्व पोलिसांच्या बदल्या सुबोधकुमार जयस्वाल यांच्या समितीने केल्या होत्या, याकडेही नवाब मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही, टोला लगावत देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ प्रथा मोडली

ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

(NCP retaliate after Devendra Fadnavis accusations about police transfers)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.