‘राष्ट्रवादी जीवलग’ योजनेचा आजपासून शुभारंभ, अजितदादांना वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट

Ajit Pawar | राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही वर्षे हे नातं घनिष्ट होणार असून 450 कुटुंबाचा एक गोतावळा निर्माण झाला पाहिजे हा या कार्यक्रमाचा भाग असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

'राष्ट्रवादी जीवलग' योजनेचा आजपासून शुभारंभ, अजितदादांना वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 2:18 PM

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेचा शुभारंभ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी 450 अनाथ मुलांशी संवाद साधत केला. अजितदादांना वाढदिवसाचे हे अनोखे गिफ्ट होते.

काल दिल्लीतून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेची घोषणा करताना अजितदादा पवार यांच्या आजच्या वाढदिवशी शुभारंभ करण्याचे जाहीर केले होते. आज सकाळी झूमद्वारे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातील 450 अनाथ मुलांशी व त्यांच्या नातेवाईकांशी राष्ट्रवादी दूतांसह संवाद साधला.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही वर्षे हे नातं घनिष्ट होणार असून 450 कुटुंबाचा एक गोतावळा निर्माण झाला पाहिजे हा या कार्यक्रमाचा भाग असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी दूतांसोबत अनाथ मुलांशी संवाद साधताना त्यांच्या सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून घेतली. शिवाय त्या मुलांना पुढे जाऊन काय करायचं आहे. व त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेतल्या. या मुलांच्या सतत त्यांच्या सुखदुःखात सोबत राहण्याच्या सूचना राष्ट्रवादी दूतांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी दिल्या. अजितदादा पवार यांचा आज 62 वा वाढदिवस असून ‘राष्ट्रवादी जीवलग’ हा एक अनोखा उपक्रम राबवत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजितदादांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.

अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस… त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केलाय. त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं. हे शिबीर महिनाभर चालणार असून यात दररोज 10 रुग्णांपर्यंत तपासणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत 200 पेक्षा अधिक रूग्णांनी नोंदणी केली आहे. नोंदणी जेवढ्यांनी केली तेवढ्यांची मोफत अँजिओप्लास्टीकरून आवश्यक रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती संदीप क्षीरसागर यांनी दिली.

संबंधित बातम्या:

एकाच दिवशी शपथ, एकत्रच राजीनामा, एकाच दिवशी वाढदिवस, फडणवीस-अजितदादांचा योगायोग

राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस, वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, कॅन्सरग्रस्तांसाठी नागपुरात उभारलं मोठं रुग्णालय

“दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” अजितदादांनी रुसवा धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.