Raut on BJP: केंद्र सरकारचा न्यायालयावर दबाव; संजय राऊतांचा पुन्हा आरोप

| Updated on: Apr 26, 2022 | 10:38 AM

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आसाम सरकारनं मेवानी यांना अटक केली आहे. कारण त्यांनी मोदींवर एक ट्वीट केलं. अटक करुन सोडल्यानंतरही पुन्हा पुन्हा अटक केली. हा सुद्धा एक मुद्दा आहे. यावरही फडणवीसांनी मन मोकळं केलं पाहिजे. कारण त्यांना जी उबग आलेली आहे, त्यावर त्यांनी बोललं पाहिजे.

Raut on BJP: केंद्र सरकारचा न्यायालयावर दबाव; संजय राऊतांचा पुन्हा आरोप
Sanjay Raut
Follow us on

मुंबईः केंद्र सरकारचा न्यायालयावर दबाव असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. केंद्राकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरूय आणि निवडणूक आयोग दहशतीखाली आहे, अशा आरोपांच्या फैरी त्यांनी केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारवर झाडल्या. राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी साहेबांचे मला कौतुकही आहे. पवारांनी चांगलं वक्तव्य केलंय की, सरकार पुन्हा येऊ शकलं नाही. येण्याची प्रबळ इच्छा होती. सत्तेत न आल्यामुळे जी अस्वस्थता आहे, त्यातून अशाप्रकारची वक्तव्य विरोधीपक्षाच्या लाउडस्पीकरमधून बाहेर पडत आहेत. या देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कसा केला जातोय, न्यायालयांवर कसा दबाव आणला जातोय, निवडूक आयोग कसा दहशती खाली आहे, याबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांना लोकशाहीची चिंता वाटतेय. त्यावर चर्चा करू. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे, ती राष्ट्रीय पातळीवरची असेल, असा टोलाही राऊत यांनी हाणला.

फडणवीसांनी मन मोकळं करावं…

राऊत म्हणाले की, एक तर जे राज्यात ठाकरे – पवारांना ओळखतात, त्यांना कळेल की, इतकं लोकशाही सरकार संपूर्ण देशात नसेल. एखादा माथेफिरू, वेडा स्वतःवर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं म्हणत फिरत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आसाम सरकारनं मेवानी यांना अटक केली आहे. कारण त्यांनी मोदींवर एक ट्वीट केलं. अटक करुन सोडल्यानंतरही पुन्हा पुन्हा अटक केली. हा सुद्धा एक मुद्दा आहे. यावरही फडणवीसांनी मन मोकळं केलं पाहिजे. कारण त्यांना जी उबग आलेली आहे, त्यावर त्यांनी बोललं पाहिजे.

घरात घुसून वातावरण बिघडवता…

राऊत म्हणाले की, फडणवीसांनी आपल्या देवघरात हनुमान चालिसा वाचावी आणि मन शांत करावं. जर या देशात कुणी लोकशाहीवर हल्ले करत असेल, तर जशात तसं उत्तर लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी गरजेचंय. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही चुकीची माहिती दिली असेल, तर त्यांनी माहिती घ्यावी. देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. त्याचा शोध घ्यावा. दुसऱ्याच्या घरात घुसून वातावरण बिघडवणार असाल, तर तुमच्यावर गुन्हा दाखलच होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमची गदा फिरेल अन्…

राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठकीला गरज नव्हती, तो गृहखात्याचा विषय होता. पण उगाच विरोधी पक्षानं उगाचच खाजवत बसू नये. एक दिवस कातडी हातात येईल. तुमचीच मागणी होती ना भोंग्याबाबत, आम्ही केंद्रावर टाकलंय. अशा बैठकांमध्ये विरोधी पक्ष जाणीवपूर्ण येत नसेल, तर हे चांगलं नाही. अशा प्रकारे राजद्रोह करणाऱ्यांवर यूपीत खटले आणि गुन्हे दाखल केलेलेत. विरोधी पक्ष स्वतःच्या हातातली घंटा वाजवत बसली आहे. आमच्या हातातली गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायचची तेव्हा आपटेल, असा इशाराही त्यांनी दिला.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!