Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा शंभर टक्के अपहार झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. ते भूमिगत झाले होते. फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचा निकाल पहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पहाल. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपींची कसून चौकशी व्हायला पाहिजे.

Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड
संजय राऊत आणि किरीट सोमय्या.
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:45 AM

मुंबईः जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी मुंबईत पुन्हा एकदा भाजप नेते आणि आएनएस विक्रांत प्रकरणात संशयित असलेले किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टीकेच झोड उडवली. राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी आपण आरोपी आहात हे विसरू नये. तुमच्यावरती आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केलेला आहे. टीव्हीसमोर येऊन मोठ्यामोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. आणि याही पेक्षा भयंकर अशी तुमची प्रकरणे समोर येणार आहेत हे लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे आता पितळ उघडे पडलेले आहे. तेव्हा कोणी जर काही म्हणत असेल, तर त्यांना म्हणू द्या. आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

आंबेडकरांनी अश्रू ढाळले असते…

संजय राऊत म्हणाले की, घोटाळा 58 रुपयांचा असो की 58 कोटींचा असो. गुन्हा हा गुन्हाच असतो. सोमय्यांना न्यायालयाने अजून निरपराध ठरवले नाही. मात्र, महाराष्ट्रात एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना न्यायालयात दिलासा कसा मिळतो. महाविकास आघाडीच्या लोकांना असा दिलासा का मिळत नाही. न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत, त्यामुळे असे सुरू आहे. आता आम्ही कोणाला कायदा शिकवायचा. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे पाहून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाळले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आरोपीने संयम बाळगावा…

राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा शंभर टक्के अपहार झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. ते भूमिगत झाले होते. फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचा निकाल पहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पहाल. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपींची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आरोपी उगाच जास्त वचवच करू नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवलाय याबाबत लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम असल्याचेही ते म्हणाले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.