Eknath Shinde: आता एकनाथ शिंदेंची खरी कसोटी लागणार? मंत्रीपद मिळालं तर सहकारी राहणार नाही तर पुन्हा बंड? 5 आव्हानं

एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 बंडखोर आमदारांचे भवितव्य हे एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. कारण ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे ते सर्व आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या सरकारमध्ये सांभाळण्याचे आवाहन असणार आहे.

Eknath Shinde: आता एकनाथ शिंदेंची खरी कसोटी लागणार? मंत्रीपद मिळालं तर सहकारी राहणार नाही तर पुन्हा बंड? 5 आव्हानं
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 12:14 AM

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result 2022) बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Rebel MLA Eknath Shinde) मुंबत ते सूरत, सूरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा असा प्रवास सुरू असताना रात्रीच्या वेळी भाषणातून आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बंडखोर आमदारांबरोबरच भाजपच्या (BJP)गोठात आनंदाला उधान आले. रात्रीच्या वेळी राजीनामा देत असल्याचे जाहीर करताच भाजपमध्ये पेढे वाटपाला सुरूवात झाली.मात्र या सगळ्या नाट्याला ज्यामुळे सुरूवात झाली त्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची आता या पुढील वाटचाल ही खरी कसोटीची असणार आहे.

एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून उद्या सत्ता सत्तास्थापनाचा दावा करणार असले तरी यामध्ये खरी कसोटी लागणार आहे ती एकनाथ शिंदे यांची. कारण ज्या शिवसेनेतून फुटून बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले ते सगळेच बंडखोर आमदार हे शिवसेनेचेचे असल्याने आता एकनाथ शिंदे यांनी खरी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदं मिळाली तरी सहकाही राहतील नाही तर पुन्हा बंड होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हानं आहेत एवढं मात्र नक्की आहे.

1. सर्वांना मंत्रिपदं आणि महामंडळे देणे

विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री आणि गटनेते पदावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंड केलेले आमदार आता मुंबई, सूरत, गुवाहाटी, गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येणाऱ्या 50 आमदारांचे भवितव्य आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांच्या समोर आता खरं आव्हान आहे ते म्हणजे सर्वांना मंत्रिपद देणे आणि महामंडळांचे वाटप करण्याचे खरी कसरत असणार आहे.

2. हे सर्व शिवसैनिक असल्याने त्यांना सोंभाळण्याचं आवाहन

एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 बंडखोर आमदारांचे भवितव्य हे एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. कारण ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे ते सर्व आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या सरकारमध्ये सांभाळण्याचे आवाहन असणार आहे. बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदारांनी विकासाचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर बोट ठेवणाऱ्या आमदारांना आता या सरकारमध्ये विकासाची दिशा कशी सापडणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

3. आमदारांना निधी देणे. नाही दिला तर पुन्हा बंड होण्याची भीती

ज्या आमदारांनी बंड करून एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे, त्या सर्वच आमदारांना आता एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन जावं लागणार आहे. सोबत घेतले, त्यांना पदं दिली, महामंडळे दिली तरी खरा प्रश्न उरणार आहे तो आमदार निधींचा. आता जे बंड झाले आहे, ते याच मुद्यामुळे त्यामुळे येणाऱ्या दिवसातही सोबत असलेल्या आमदारांना निधी देणे, त्यांच्या मतदारांचा संघांचा विकास करणे यागोष्टी येणारच आहेत. नसेल तर पुन्हा बंड होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

4. पुन्हा निवडून आणण्याची हमी

महाविकास आघाडीला बंडखोर आमदारांमुळे पाय उतार व्हावं लागले आणि शिवसेनेचाच असलेल्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. त्यामुळे याचे खरे शल्य हे कट्टर असणाऱ्या शिवसैनिकांना असणार आहे. कारण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्षा हा शासकीय बंगला सोडला तेव्हा शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन मुख्यमंत्र्यांनी पाहिले होतेच मात्र त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे गटानेही पाहिले होते. त्यामुळे आता बंडखोर केलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची हमी आणि त्यांना द्यावा लागणारा विश्वासही आमदार एकनाथ शिंदे यांना द्यावा लागणार आहे.

5. शिवसेनेवर ताबा मिळवणे

आम्ही शिवसेनेतच आहे, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत, त्यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे सांगत होते. त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही प्रश्न पुढे आला आणि हे बंडखोरीचे नाटयाने आणखी वेग घेतला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यावर खरी परीक्षा देण्याची वेळ येणार आहे ती शिवसेनेवर ताबा मिळवण्याची. कारण बंडखोर केलेले सगळेच आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवधनुष्य कसं पेलणार ते आता येणारा काळच ठरवणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.