महाराष्ट्राच्या मुंबईत पुन्हा मराठी मुले कामाला नको…खासगी कंपनीच्या मालकाचा व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओमध्ये मराठी मुले काम दोन दिवस सोडून जातात, असे सांगत असल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मान्य केले. परंतु कंपनीत १५ टक्के मराठी लोक आहेत, त्यांचा सांगण्याचा उद्देश असा नाही, अशी बाजू सावरण्याचा प्रयत्न त्या कंपनीतील मराठी कर्मचारी करताना दिसत आहे.
महाराष्ट्रात मराठी द्वेष करणाऱ्या प्रवृत्ती अधूनमधून समोर येत असतात. या प्रवृत्तींवर धडक कारवाई होत नसल्यामुळे मराठी लोकांचा अवमान करण्याचे प्रकार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, अशी शेरेबाजी अखिलेश शुक्ला यांनी केली होती. ते प्रकरण राज्यभर गाजले. त्यानंतर शुक्ला यांना अटकही झाली. आता मुंबईतील मरीन लाईन येथील एका कंपनीकडून मराठी मुलांचा अवमान करण्याचा प्रकार घडला आहे. त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी त्या कंपनीच्या मालकाला जाब विचारला आहे.
काय घडला प्रकार
मराठी पोर आमच्याकडे कामाला सुट होत नाहीत, असे वक्तव्य राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने केले आहे. महाराष्ट्रात व्यवसाय आणि उद्योग करणाऱ्या या कंपनीच्या मालकाने केलेल्या वक्तव्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्राच्या मुंबईत पुन्हा एकदा मराठी तरुणावर अन्याय झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
मराठी पोर आम्हाला कामाला नको. मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला. मराठी मुले आमच्याकडे कामाला येतात आणि दोन दिवसांत सोडून जातात. म्हणून आम्हाला मराठी पोर कामाला ठेवत नाही. मराठी पोर आमच्यासाठी सुट होत नाहीत, असे देखील राधेशाम ब्रदर्स कंपनीतील कंपनीचा मालक बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
कंपनीतील मराठी कर्मचारी मालकाच्या बाजूने
राधेशाम ब्रदर्स कंपनीचा मालक मुलाखतीस गेलेल्या मराठी तरुणाला कामावर घेण्यासाठी नाकारले. मुंबईतील मरीन लाईन येथील घटना समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार समजल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी व्यापाऱ्याला जाब विचारला. संतोष शिंदे म्हणाले, मुलाखतीत तीन मराठी मुलांचे बायोडाटा त्यांनी बाजूला काढले.
व्हिडिओमध्ये मराठी मुले काम दोन दिवस सोडून जातात, असे सांगत असल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मान्य केले. परंतु कंपनीत १५ टक्के मराठी लोक आहेत, त्यांचा सांगण्याचा उद्देश असा नाही, अशी बाजू सावरण्याचा प्रयत्न त्या कंपनीतील मराठी कर्मचारी करताना दिसत आहे.