राज यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उ. प्रदेशातून समर्थनाचे खूप फोन येत आहेत, एकाचा विरोध, सगळ्यांचा कसा?, मनसेचा सवाल

दीपाली सय्यद यांच्यावरही नांदगावकरांनी टीका केली आहे. त्या मोठ्या नेत्या आहेत. आणि आता संजय राऊत यांच्यानंतर त्याच आता पक्षात ज्येष्ठ आहेत

राज यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उ. प्रदेशातून समर्थनाचे खूप फोन येत आहेत, एकाचा विरोध, सगळ्यांचा कसा?, मनसेचा सवाल
Bala nandgaonkar on Ayodhya tourImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 8:23 PM

मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांच्या अयोध्या (Ayodhya tour)दौऱ्याबाबत उ. प्रदेशातून आम्हाला खूप फोन (calls from Uttar Pradesh)येत आहेत, तिथल्या जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय. एकाचा विरोध हा सगळ्यांचा विरोध कसा असून शकेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अयोध्येचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात उ. प्रदेशात मोहीमच उघडली आहे. दररोज ते राज ठाकरेंवर टीका करीत आहेत. राज ठाकरे जोपर्यंत उ. भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलचं तापलेलं आहे. बृजभूषण टीका करत असताना मात्र मनसेकडून त्यांना फारसं प्रत्युत्तर दिलं जात नाहीये.

विरोधानंतरही मनसे शांत

खासदार बृजभूषण सिंह हे भाजपाचे खासदार आहेत, त्यांना योग्य वेळी भाजपा शांत करेल असे मानले जाते आहे. त्यामुळे मनेसकडून बृजभूषण यांना उत्तरं दिलं जात नाहीये. उलट अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील सगळ्यांनी बोलू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी दोन आठवड्यापूर्वी काढले होते. बृजभूषण यांच्या टीकेनंतर पहिल्यांदाच मनसेच्या मोठ्या नेत्याने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यातही त्यांनी बृजभूषण यांचे नाव घेण्याचे टाळले आहे.

दीपाली सय्यद यांच्यावरही टीका

राज ठाकरे यांना उ. प्रदेशात जाण्याची भीती वाटत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंचा हात हातात घेऊन जावे, अशी टीका करणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद यांच्यावरही नांदगावकरांनी टीका केली आहे. त्या मोठ्या नेत्या आहेत. आणि आता संजय राऊत यांच्यानंतर त्याच आता पक्षात ज्येष्ठ आहेत, अशा शब्दांत नांदगावकरांनी सय्यद यांच्यावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसभा निवडणुकीसाठी अद्याप संपर्क नाही

राज्यसभा निवडणुकांसाठी अद्याप पक्षाशी संपर्क झालेला नाही. मनसेचा एकच आमदार आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्याकडूनही काही संपर्क झाला नसल्याचे नांदगावकरांनी सांगितले आहे. त्या निवडणुकीत पक्षाचा फारसा सहभाग नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा

 राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी २२ मे रोजी रविवारी पुण्यात सकाळी त्यांची सभा होणार आहे. या सभेत राज बृजभूषम सिंह यांच्या टीकेला उत्तर देण्याची शक्यता आहे. मनसैनिकांना घएऊन मोठ्या संख्येने अयोध्या दौरा राज ठाकरे करतील.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.