मध्य रेल्वेच्या दादर स्थानकांच्या फलाट क्रमांकात बदल, पाहा केव्हापासून होणार नवा बदल लागू

दादर नावाचे एकच स्थानक मध्य आणि पश्चिम मार्गावर खेटून असल्याने मुंबईत नवीन आलेल्या प्रवाशांचा गोंधळ होत असतो. एकाच क्रमांकाचे दोन - दोन फलाट असल्याने हा गोंधल होत असतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेला लागून असलेल्या मध्य रेल्वेच्या फलाटांना 8 ते 14 असे नवीन क्रमांक देण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकांच्या फलाट क्रमांकात बदल, पाहा केव्हापासून होणार नवा बदल लागू
dadar stationImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 1:10 PM

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य आणि पश्चिम मार्ग जेथे एकत्र येतात त्या दादर रेल्वे स्थानकातील मध्य रेल्वेच्या हद्दीतील स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील स्थानकातील फलाट क्रमांक 1 आता फलाट क्रमांक 8 होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांकात कोणताही बदल होणार नाही. फलाट क्रमांक 2 बंद करून फलाट क्रमांक एकचा विस्तार करण्यात आला आहे. येत्या 9 डिसेंबरपासून हा बदल करण्यात येणार आहे.

असे होणार फलाट  क्रमांकात बदल

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकाचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 1 आता फलाट क्रमांक आठ होणार आहे. तर तेथून पुढे मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांकाची गणना होणार आहे. अर्थात सध्याचा फलाट क्रमांक 2 अस्तित्वात नसणार आहे. तर मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 3 ला आता फलाट क्रमांक 9 , फलाट क्रमांक 4 ला आता फलाट क्रमांक 10, फलाट क्रमांक पाचला 11, सहाला 12, सातला 13 आणि आठला फलाट क्रमांक 14 असे क्रमांक देण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकात कोणताही बदल होणार नाही.

दादरची रचना

दादर नावाचे एकच स्थानक मध्य आणि पश्चिम मार्गावर खेटून असल्याने मुंबईत नवीन आलेल्या प्रवाशांचा गोंधळ होत असतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेला लागून असलेल्या मध्य रेल्वेच्या फलाटांना 8 ते 14 असे नवीन क्रमांक देण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेतून पश्चिम रेल्वेवर इंटरचेंज करताना प्रवाशांचा गोंधळ होत असता त्यामुळे सिक्वल नंबर देण्यात येणार आहेत.

9 डिसेंबर पासून हा बदल

दादर स्थानकात एकूण 15 फलाट आहेत. त्यातील टर्मिनल फलाटासह ( लांब पल्ल्याच्या गाड्यासाठीचा ) 8 फलाट मध्य रेल्वेच्या हद्दीत आहेत. सात फलाट पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आहेत. दादर स्थानकांतील एकाच क्रमांकाचे दोन फलाट असल्याने नवीन प्रवाशांचा गोंधळ होत असतो. त्यासाठी हा बदल करण्यात आला असून येत्या 9 डिसेंबर पासून हा बदल प्रत्यक्षात लागू होणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.