मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाची शिफारस : सूत्र

विलास आठवले, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारा अहवाल मागासवर्ग आयोगाने तयार केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 तारखेपूर्वी राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरत आहे. […]

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाची शिफारस : सूत्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

विलास आठवले, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारा अहवाल मागासवर्ग आयोगाने तयार केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 तारखेपूर्वी राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरत आहे. आधी 58 मूक मोर्चे, त्यानंतर ठोक मोर्चे काढत आरक्षणाची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. त्यानंतर राज्य सरकारने सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना आणून, मराठा समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आरक्षणाची मागणी मराठा समाजाने लावून धरल्यानंतर सरकारने मागासवर्ग आयोगाकडे अहवाल मागितला. तो अहवाल राज्य सरकारकडे 15 तारखेपूर्वी सादर होण्याची शक्यता आहे.

गेल्या 12 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या वतीने उपोषण केले जात आहे. शिवाय, 15 तारखेपूर्वी आरक्षण मिळालं नाही, तर आणखी आक्रमक होण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुद्धा वेगवान झाल्या आहेत.

त्यातच 19 तारखेपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाआधी सरकारने मराठा आरक्षणासंबंधी काही हालचाली केल्या नाहीत, तर सभागृहातही याचे पडसाद उमटतील, यात शंका नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.