मुंबई पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय? वाचा A टू Z, कुणाला किती मतं मिळाली? 

Mumbai Graduate Constituency Result : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जास्त चुरशीची मानली जात होती. कारण या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटात यांच्यात काँटे की टक्कर असेल, असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूने जोरदार ताकद लावण्यात आली होती. आता या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय? वाचा A टू Z, कुणाला किती मतं मिळाली? 
मुंबई पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय?
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 9:30 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या महिन्यात 26 जूनला या चार जागांसाठी निवडणूक पार पडली. यानंतर आज या निवडणुकीचा निकाल समोर येतोय. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जास्त चुरशीची मानली जात होती. कारण या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटात यांच्यात काँटे की टक्कर असेल, असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूने जोरदार ताकद लावण्यात आली होती. या दरम्यान ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाच्या मतदारांची नावे गाळली जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरसीची असल्याचं दिसत होतं. पण आता समोर आलेल्या निकालानुसार, या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा या निवडणुकीत तब्बल 44 हजार 784 मतांनी विजय झाल्याचं समोर आलं आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी अधिकृतपणे याबाबतची घोषणाबाजी केली आहे.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता, असं पी. वेलरासू यांनी सांगितलं.

पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

  1. ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :- 44 हजार 784 (विजयी)
  2. किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
  3. योगेश बालकदास गजभिये  :- 89
  4. ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
  5. ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- 11
  6. मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
  7. रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- 26
  8. ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37

अनिल परब यांची प्रतिक्रिया काय?

या विजयानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी झालोय. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. हा विजय माझ्या सर्व शिवसैनिकांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. हा विजय मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे. ज्या निष्ठेने सर्व मविआचे घटकपक्ष आणि शिवसैनिक लढले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर अशाचप्रकारे रहावा, अशी मी प्रार्थना करतो”, असं अनिल परब म्हणाले.

“आम्ही नेहमी घोषणा देतो, मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. ही घोषणा आम्ही सत्य करुन दाखवली आहे. शिवसेना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ असो, मुंबईत शिवसेनाच आहे. ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. शिक्षक मतदारसंघामध्येही विजयाच्या आम्ही अंतिम टप्प्यावर आहेत. मुंबईतील शिक्षक हे शिवसेनेसोबत आहेत हे सिद्ध झालं आहे. अधिकृत आकडेवारी सांगायची झाली तर मला 44 हजार 700 मते मिळाली आहेत. मी प्रतिस्पर्धीवर 26 हजार 26 मतांनी मात केली आहे. ही पदवीधर मतदारसंघामधील आजवरचा उच्चांक आहे”, असा दावा अनिल परब यांनी केला.

दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या पसंतीच्या मतांची गणनी करण्यात आली त्यामध्ये 5800 मतांचा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र कुठल्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मते कुणासाठी निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकी लढत कुणाकुणामध्ये?

  • कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस)
  • मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट)
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती)
  • नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट)
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.