आताच्या काळात काँग्रेसकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाहीत: भाजप नेत्यानं काँग्रेसला सरळ मोडीतच काढलं

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सध्याच्या काळात काँग्रेसला कोणत्याही प्रकारचे राजकीय भवितव्य नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपचा विचार करायला काय हरकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आताच्या काळात काँग्रेसकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाहीत: भाजप नेत्यानं काँग्रेसला सरळ मोडीतच काढलं
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 4:18 PM

मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल भाजपवर सडकून टीका केली होती. भाजप पाहिजे वल्गना करत असते अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेविषयी महसूल मंत्री राधाकृष्म विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी मुळात संजय राऊत कोण आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याला आम्ही काही बांधिल नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडवून लावलं.

खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात असते, मात्र केंद्र आणि राज्य सरकार आपापली कामं करत असल्याचे सांगत. त्यांनी संभाजीनगर आणि औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांनी या सरकारव टीका करू नये असा जोरदार हल्लाबोलही करण्यात आला.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करून पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना माहिती होता असं वक्तव्य केले होते.

त्याविषयीही बोलतानाही त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य करताना जबाबदारीनेच केले असणार याबाबत शंका नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसविषयी बोलताना सांगितले की, आताच्या काळात काँग्रेस पक्षाचं काय राहिले आहे. काँग्रेसला आता देशात काय भवितव्य असणार असं म्हणत त्यांनी काँग्रेसला मोडीत काढले आहे.

त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणूनही ते राज्याला माहिती आहेत.

मात्र आता त्यांनी आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा विचार करायला हवा. कारण देशाने आणि जगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली एकदा त्यांनी काम करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सध्याच्या काळात काँग्रेसला कोणत्याही प्रकारचे राजकीय भवितव्य नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपचा विचार करायला काय हरकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.